लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा पोलिसांनी श्री एकविरा देवीच्या उत्सवादरम्यान अवैध दारुविक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर धडक कारवाई केली. यात तब्बल 36720 रुपयांच्या बेकायदा विदेशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून 3 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना स्वतः गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, श्री एकविरा चैत्री उत्सवादरम्यान काही व्यक्ती त्यांच्याकडे बेकायदा बिगर परवाना विदेशी दारुचा साठा जवळ बाळगुन विक्री करीत आहेत. सदरची माहिती मिळाल्याने लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी स्वतः पथकासह व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचेकडील स्टाफ असे समांतर पथक तयार करून मौजे वेहेरगाव (ता. मावळ) येथे पायी पेट्रोलींग करायला सुरुवात केली. पेट्रोलिंग दरम्यान भुषण विनायक पडवळ, केशव नारायण चौधरी आणि नवनीत कोरागा खंबाडी (सर्व रा. वेहेरगाव, ता. मावळ, जि.पुणे) यांचे ताब्यात विदेशी दारुचा साठा मिळून आला. एकुण 36720 रुपयांच्या मुददेमालासह तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. ( Lonavala police action during Ekvira Devi festival 3 arrested with illegal foreign liquor )
सहायक पोलीस उपनिरीक्षक मारुती बारकु गोफणे यांनी याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. (१)९४/२०२३, (२) ९५/२०२३, (३) ९६ / २०२३ महाराष्ट्र प्रोव्हीशन कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– मावळमधील ‘या’ गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा आमदार शेळकेंनी घेतला आढवा, अडचणी सोडवून कामे जलद पूर्ण करण्याच्या सुचना
– कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने आढले खुर्द येथील भैरवनाथ देवाचा वार्षिक उत्सव संपन्न, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा विशेष सत्कार