लोणावळा शहरातील परमार हॉस्पिटलजवळ लक्ष्मी निवास बिल्डिंगमध्ये गुरुवारी (दिनांक 20 जुलै) पहाटेच्या सुमारास घडलेल्या चोरीच्या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अवघ्या 12 तासात गजाआड केले आहे. यश धर्मेश कांबळे (वय 20, रा. लिमुनीगुंज बुद्धविहार, खडकी, पुणे), शकील कासीम शेख याच्यासह अल्पवयीन आरोपी मुलगा यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चिराग जुन्नरकर यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
फिर्यादी सांगितल्याप्रमाणे, चिराग जुन्नरकर यांच्या घरात घुसून आरोपींनी त्याला आणि त्याच्या वडिलांना चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. घराच्या हॉलमधील साउंड सिस्टम, मोबाईल व रोख रक्कम असे एकूण 36 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते. ( Lonavala Police And Local Crime Branch Arrested Accused In Crime Of Theft Within 12 Hours )
लोणावळा शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा ह्यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत यश कांबळे, शकील शेख व अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपींना लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे व लोणावळा उपविभागीय सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अब्दुल मुजावर, सहायक फौजदार प्रकाश वाघमारे, कर्मचारी बाळासाहेब खडके, हेमंत विरोळे, प्राण येवले, हनुमंत शिंदे, तानाजी गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अधिक वाचा –
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगावात मोरया प्रतिष्ठानकडून रेनकोट आणि पावसाळी बूटचे वाटप
– ‘वारु – ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायत’ सरपंचपदी हरिभाऊ निंबळे बिनविरोध । Gram Panchayat Election