देशातील प्रसिद्ध हिल स्टेशन असलेल्या लोणावळा येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोणावळा जवळील वलवण येथील प्रसिद्ध हॉटेलमध्ये मुला-मुलींच्या न्यूड डान्स पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यात मध्यरात्री मोठ्या आवाजात गाणी लावून अश्लील नृत्य करणाऱ्या 53 जणांना लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी 44 पुरुष आणि 9 महिला आहेत. लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक यांंच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे लोणावळा परिसरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ( Lonavala Police Arrested Fifty Three Girls And Boys For Doing Nude Dance Party In Hotel )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा येथील व्हिस्परिंग वुड्स हॉटेलमध्ये तरुण-तरुणींकडून नग्न अश्लील नृत्य केले जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून 1 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना 53 जण कपडे न घालता नाचताना आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून साउंड सिस्टीम जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींना पोलिस कोठडी…
पुणे, मुंबईसह लोणावळा परिसरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. जिथे लोक भेटायला आणि राहायला येतात. या न्यूड डान्स पार्टीत स्थानिक लोकांव्यतिरिक्त काही बाहेरील लोकांचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांना अनेक तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत आढळले. पोलिसांनी छापा टाकताच अनेकांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सर्वांना अटक केली आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप अजिनाथ बोराडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर लोणावळा शहर पोलिसांनी भादंविच्या कलम 294, 34 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईने अशा कारवायांमध्ये सहभागी असलेले हॉटेल मालकही हैराण झाले आहेत.
अधिक वाचा –
– पोलिसांना मारहाण करुन फरार झालेल्या आरोपींना जेरबंद करण्यात यश; कामशेत पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी
– ‘योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी उज्वल यश मिळवेल’ – आमदार सुनिल शेळके