लोणावळा शहर आणि परिसर म्हणजे जगभरातील पर्यटकांचे पर्यटनासाठी हक्काचे आणि पसंतीचे ठिकाण. पावसाळी हंगामात तर लोणावळा आणि परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही सर्वाधिक असते. त्यामुळे लोणावळा शहरातून जाणारा जुना मुंबई पुणे महामार्ग आणि शहराजवळून जाणारा द्रुतगती मार्ग हे देखील या काळात फुल्ल असतात, तर कधी ट्राफिकने जाम असतात. अशावेळी पर्यटकांचा पर्यटनाचा कालावधी ट्राफिक जाममध्ये वाया जाऊ नये याकरिता यंदा लोणावळा पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. ह्या उपाययोजना वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि सुरक्षितता या दोन्ही बाजूंनी आहेत.
पावसाळी पर्यटनामुळे लोणावळ्यात पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्राधान्य दिले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या आवाहनुसार लोणावळा पोलिसांनी स्वयंसेवकांच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी वाहतूक आणि सुरक्षिततेचे खास नियोजन केले आहे. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक, पोलिसांच्या मदतीने वाहतूक कोंडी दूर केली जात आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशी होणारी वाहतूककोंडी टळण्यास मदत झाली आहे. तसेच इतर दिवशीही लोणावळा शहर आणि परिसर ट्राफिक मुक्त झालेला दिसत आहे. यासह येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक पथकांची देखील नियुक्ती केल्याचे लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले. ( Lonavala Police Conscientiousness Special measures for traffic congestion relief and safety of tourists )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा आरोपी 3 तासात गजाआड; लोणावळा ग्रामीण पोलिसांची ‘लई भारी’ कामगिरी
– लोणावळा ग्रामीण पोलिसांचा नशेखोरांवर कारवाईचा दणका! 11 जणांना खावी लागणार जेलची हवा । Lonavala Crime
– ‘संकल्प नशामुक्ती अभियान’ – मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या 8 नशेखोरांवर लोणावळा शहर पोलिसांची कारवाई । Lonavala Crime