लोणावळा शहर आणि भागात पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाची तुफान बॅटींग सुरु असून गेल्या 24 तासात लोणावळ्यात तब्बल 273 मी.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. यासह यंदा झालेला एकूण पाऊस 2017 मी.मी. इतका नोंदवण्यात आलाय. ( Lonavala Rain Update 273 mm Rain Record In 24 Hours )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बुधवारी दिवसभर शहर परिसरात पावसाचा जोर प्रचंड राहिला. यासह सोसाट्याचा वारा देखील होता, त्यामुळे शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच शहरातील अनेक सखल भागात यामुळे पाणी साठले आहे.
लोणावळा शहर आणि प्रदेशात तीन दिवस हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आणि मागील दोन दिवसापासूनचा पावसाचा तडाखा पाहता आज (गुरुवार, दिनांक 20 जुलै) लोणाळ्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरण : पीडित महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे – डॉ. नीलम गोऱ्हे
– Raigad Landslide । मोठी दुर्घटना! रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली, 35 ते 40 घरे मलब्याखाली