Dainik Maval News : लोणावळा शहर परिसरासह घाटावर सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. आज रविवार असल्याने लोणावळ्याकडे पर्यटकांची पाऊले वळली आहेत. परंतू सध्या पावसाचा जोर प्रचंड असल्याने ही स्थिती तशी पर्यटनास अनुकूल नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी, पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रविवार, सोमवार दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून पुढील तीन ते चार तास अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावे. रविवार, शाळांना सुटी असल्याने बालकांना घराबाहेर पडू देऊ नये. नागरिकांनी सुरक्षितठिकाणीच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ( Lonavala Rain Updates 4000 mm rainfall in current season )
चालू मोसमात 4000 मीमी पाऊस –
रविवार, दिनांक 4 ऑगस्ट रोजी मिळालेल्या आकडेवारी नुसार 24 तासात लोणावळा शहर आणि परिसरात तब्बल 232 मीमी अर्थात 9.13 इंच इतका पाऊस झाला आहे. गेल्या चार दिवसातील हा सर्वाधिक पाऊस आहे. यासह यंदा चालू मोसमात पावसाने 4000 मीमी चा टप्पा ओलांडला असून आजपर्यंत 4047 मीमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. शहर भागातील सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली असून नदीपात्र, ओढे नाले दुथडी भरून वाहू लागलीत. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.
अधिक वाचा –
– पवना धरण 92 टक्के भरले ! पावसाचा जोर वाढल्याने धरणातून 5000 क्युसेक विसर्ग सुरू, नागरिकांनी काळजी घ्यावी । Pavana Dam Updates
– ‘अभी नहीं तो कभी नहीं…’ भाजपाच्या विजयी संकल्प मेळाव्यात मावळ विधानसभा लढविण्याचा निर्धार । Maval BJP News
– स्व. संकेतदादा असवले प्रतिष्ठानकडून सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा कायम ; विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप । Maval News