व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उड्डाणपुलाचे काम मुदतीत सुरू न झाल्यास लोणावळा नगरपरिषदेला टाळे ठोकणार ; आमदार शेळके यांचा इशारा । Lonavala News

लोणावळा शहर हद्दीत गेल्या दहा वर्षांत बांधण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या 15 दिवसांत हटविण्याच्या सूचना

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 21, 2025
in लोकल, शहर
Lonavala Review Meeting MLA Sunil Shelke directive to start work of Bhangarwadi flyover before March 10

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरातील मुख्य प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली. सदर बैठकीत सूचना करून देखील नगरपरिषद प्रशासन दिरंगाई करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यात प्रामुख्याने भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाचे काम 10 मार्च पर्यंत सुरु करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जर मुदतीत काम सुरू झाले नाही तर लोणावळा नगरपरिषदेला टाळे ठोकणार असल्याचा इशारा आमदार सुनिल शेळके यांनी दिला.

लोणावळा नगर परिषद हद्दीतील विकास कामे आणि प्रलंबित कामांचा आढावा आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थित घेण्यात आला. यावेळी शेळके बोलत होते. यावेळी, खंडाळा येथील नगरपरिषद शाळेच्या विस्तारीकरणासाठी लगतच्या जागा मालकांना तत्काळ उर्वरित पैसे देऊन जागा ताब्यात घेण्याबाबत सूचनाही शेळकेंनी दिल्या. यामध्ये कोणतेही राजकारण अथवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे देखील अधिकाऱ्यांना सांगितले.

  • लोणावळा शहराचा पर्यटन दृष्ट्या विकास साधण्यासाठी वळवण तलावाच्या विकास आराखड्याची पाहणी करण्यात आली. त्यासाठी सुमारे 8 कोटी रुपये अंदाजित खर्च येणार असून 50 टक्के खर्च नगरपरिषदेने करावा आणि 50 टक्के खर्च जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देणार असल्याचे आमदारांनी सांगितले आहे.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सुरू असून उर्वरित कामासाठी सूर्यकांत वाघमारे यांनी मागणी केली, त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 2 कोटी 78 लक्ष इतक्या निधीची उपलब्धता येत्या काही महिन्यात केले जाईल, असे आश्वासन शेळके यांनी यावेळी दिले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला असता सदर काम अतिशय दर्जेदार पद्धतीने होत आहे. परंतु शहरातील उर्वरित कामे देखील अशाच दर्जेदार पद्धतीने करण्याबाबत सूचना दिल्या.

  • लोणावळा शहराच्या सौंदर्याचे भान राखून गेल्या दहा वर्षांपेक्षा जुन्या टपरी धारकांचे होकर्स झोन करून पुनर्वसन करेपर्यंत त्यांना हटविण्यात येऊ नये, परंतु नव्याने टाकलेल्या 10 वर्षांच्या आतील टपऱ्यांचे अतिक्रमण 15 दिवसांत हटविण्याबाबतच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात लोणावळा शहरात केलेल्या जनसंवाद दौऱ्या दरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने ; खंडाळा येथील तलाव लगत अनेक वर्षांपासून राहणाऱ्या स्थानिक बांधवांना घरकुल, रस्ते व मूलभूत सुविधा मिळणे, महात्मा फुले भाजी मंडई विकसित करणे, रामनगर येथील गायरान जागा घरकुल योजनेसाठी उपलब्ध करणे, शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, अनुकंपा तत्वावरील वारसांना नोकरी मिळणे, इंदिरानगर येथे पोलिस क्वार्टरजवळील अंतर्गत रस्ता करणे, खंडाळा येथील जिम साहित्य बसविणे, नवीन अंगणवाड्या इमारती बांधणे, शहरातील स्वच्छता, अनधिकृत पाणी पुरवठा कनेक्शन या विषयांबाबत सूचना देण्यात आल्या.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश 


Previous Post

दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण ; पवनानगर केंद्रावर 417 विद्यार्थी देणारी दहावी बोर्डाची परीक्षा । SSC Exam 2025

Next Post

पवन मावळातील मौजे शिळींब गावात ३९५ वा शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा । Shiv Jayanti 2025

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
395th Shiv Jayanti Festival Celebrated With Enthusiasm In Shilimb Village of Pavan Maval

पवन मावळातील मौजे शिळींब गावात ३९५ वा शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा । Shiv Jayanti 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Municipal Council Chief Officer cabin opened on orders of District Magistrate

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उघडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन ; लोणावळा नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचे मनोमिलन

March 28, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड ! पाहा सर्व विषय समित्यांची यादी

March 28, 2026
PM-Rahat scheme for road accident victims Immediate cashless treatment relief of up to one and half lakh rupees

PM-RAHAT : रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी ‘पीएम-राहत’ योजना : अपघातग्रस्तांना तात्काळ दीड (१.५०) लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा

March 28, 2026
school

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेअंतर्गत ४०५ शाळा विकसित करण्यास राज्य शासनाची मंजूरी

March 28, 2026
Water supply scheme worth Rs 39 crore inaugurated at Vadgaon Maval initiative of MLA Sunil Shelke

वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा

March 28, 2026
Stormy wind and rain image

राज्यात दिनांक ३० आणि ३१ मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.