Dainik Maval News : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 25 मार्च रोजी रात्री बाराच्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक्स्प्रेस वेवर दोन संशयित कंटेनर ताब्यात घेतले होते. त्या कंटेनरमध्ये जनावरांचे मांस होते. दोन्ही कंटेनरमधील मांसाचे नमुने हे तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते त्यांचा अहवाल शनिवारी उशिरा प्राप्त झाला असून, त्या कंटेनरमध्ये असलेले मांस हे गोमांस असल्याचे स्पष्ट झाल्याने शनिवारी रात्री उशिरा लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कंटेनरमध्ये मिळून तब्बल 57 हजार किलो मांस आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे गोमांस विक्रीसाठी नेले जात होते.
लोणावळा ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कंटेनर (एमएच 46 बीएम 9180) व कंटेनर (एमएच 46 सीयू 9966) हे व त्यांचे चालक नदीम कलीम अहमद (राहणार न्हावाशेवा, नवी मुंबई) व नसीर मोहंमद अहमद (राहणार न्हावाशेवा, नवी मुंबई) यांना ताब्यात घेतले आहे.
- मे. एशियन फूड्स मीन अँग्रो (न्यू भोईबुडा, सिकंदराबाद हैदराबाद) या कंपनीमधून हे दोन्ही एअर कंडिशनर कंटेनर मांस भरून (न्हावाशेवा, पोर्ट मुंबई) येथे ट्रान्स्पोर्ट करण्यासाठी निघाले होते. पुणे येथील एका गोरक्षकाने याबाबतची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलिस व लोणावळा शहर ग्रामीण भागामधील गोरक्षक व विविध संघटनांचे कार्यकर्ते यांनी सदरचे कंटेनर पकडले होते.
सुरुवातीला या मासांबाबत कागदपत्रे दाखवत ते गोमांस नसून म्हशीचे मांस असल्याचे सांगण्यात आले होते. तशा प्रकारची कागदपत्रे देखील दाखवली गेली. मात्र, गोरक्षक संघटनांनी सदरची कागदपत्रे संशयास्पद असून, कंटेनरमधील मांसाची तपासणी झाल्याशिवाय सदरचे कंटेनर पुढे सोडण्यात येऊ नये, अशी मागणी लावून धरली व लोणावळा ग्रामीण पोलिसांनीदेखील सदरच्या मासाचे सॅम्पल घेत ते तपासणीसाठी पाठवले.
- तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. तोपर्यंत कंटेनर ताब्यात ठेवण्याची आश्वासन त्यांनी दिले होते. 29 मार्च रोजी याबाबत तपासणी अहवाल लोणावळा ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाला असून, कंटेनरमध्ये असलेले मांस हे गोवंशीय मांस असल्याने निष्पन्न झाले असल्याचे लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले.
मे. एशियन फूड्स मीन अँग्रो (न्यू भोईबुडा, सिकंदराबाद हैदराबाद) या कंपनीचे मालक मोहम्मद सादिक कुरेशी व इतर यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोहा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ हे करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade