लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी (दिनांक 28 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास लोणावळा जवळील वेहेरगाव इथे गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर छापा टाकला. यावेळी पोलिस कारवाईत 80 हजार रुपये किंमतीचा तब्बल 1600 लीटर दारूसाठा आणि कच्चा माल जप्त करण्यात आला. तसेच एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलीस हवालदार केतन महादू तळपे यांनी याबाबत लोणावळा पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत नेताराम धरम सिंग राठोड (वय 40 वर्ष रा. कांजारभट वस्ती वेहेरगाव तालुका मावळ) यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेहेरगाव हद्दीत देवकर वस्ती जवळील कंजारभट वस्ती इथे माळरान भागात नेताराम धरम सिंग राठोड हा त्याच्या घराजवळ बेकायदा विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याठिकाणी धाड टाकली.
यावेळी पोलिसांना गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, एकूण 1600 लीटर कच्चे रसायन प्रत्येकी 50 रुपये लीटर प्रमाणे अंदाजे किंमत 80 हजार रुपये हे जवळ बाळगून त्याची गावठी दारू तयार करण्याच्या तयारीत नेताराम राठोड मिळून आला, असे फिर्यादीत नमुद आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश होळकर हे करत आहेत.
अधिक वाचा –
– पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी उपाययोजना करा – खासदार श्रीरंग बारणे
– मावळ कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा अंतिम निकाल! मविआच्या सहकार पॅनलची निर्विवाद सत्ता, पाहा कुणाला किती मते मिळाली