व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अवैधरित्या गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह अटक; लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई

पथकाने मौजे वरसोली (ता. मावळ जि. पुणे) गावाच्या हद्दीमध्ये मुंबई ते पुणे हायवे रोडवर एम. एस. ई. बी. रेस्ट हाउसचे समोर सापळा रचून अत्यंत शिताफीने टेम्पो पकडला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 15, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavala-Rural-Police

Photo Courtesy : Lonavala Rural Police


सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक (उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग लोणावळा) यांच्या सुचनांप्रमाणे संकल्प नशामुक्ती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियांनार्तगत लोणावळा विभागामध्ये दारुविक्री, वाहतूक, गुटखा वाहतूक, गुटखा विक्री, गांजा वाहतूक व विक्री अशा केसेस करण्यात आलेल्या आहेत. ( Lonavala Rural Police Seized Ganja On Old Pune Mumbai Highway )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्प नशामुक्ती अभियानातून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली;

1) गांजाचे सेवन करणारे लोकांचेविरुध्द कारवाई – 4
2) अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारे वाहनांवर कारवाई – 1
जप्त माल – 6,83,१२० रुपयांचा गुटखा व वाहने
3) दारुबंदी कायदयाखाली गुन्हे – 27
जप्त माल – 2,94,010 रुपये किंमतीची देशी, विदेशी व गावठी दारु

दिनांक 11 जुलै 2023 रोजी ग्रे रंगाचा छोटा हत्ती मालवाहतूक टेम्पो नं. MH48 CB 1828 यामधून मुंबई ते पुणे रोडने मुंबई बाजूकडून पुणे बाजूकडे गांजाची वाहतूक होत आहे. अशी पोलीस अंमलदार केतन तळपे यांना खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच छापा कारवाई करीता वरीष्ठांना कळवून त्यांचे परवानगीने मौजे वरसोली ता. मावळ जि. पुणे गांवचे हद्दीमध्ये मुंबई ते पुणे हायवे रोडवर एम. एस. ई. बी. रेस्ट हाउसचे समोर सापळा रचून अत्यंत शिताफीने टेम्पो पकडला.

त्यामध्ये इसम नामे 1) अशोक भूजंग चव्हाण (वय ४३ वर्षे रा. धामणी खालापूर ता. खालापूर जि. रायगड) आणि 2) शंकर भगवान साळुंखे (वय 30 वर्षे रा. ठोंबरेवाडी लोणावळा ता. मावळ जि. पुणे) यांच्यासह सदर टेम्पोची झडती मध्य 20 किलो बिया – बोंडासह हिरवट काळसर तपकीरी रंगाचा ओलसर गांजा हा अंमली पदार्थ व औमपो असा एकुण 6,50,000 रुपयांचा माल जप्त करण्यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला यश आले आहे.

हेही वाचा – राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर! अजितदादांनी बाजी मारली, कुणाच्या वाट्याला कोणतं खातं? लगेच वाचा

सदरबाबत यातील आरोपींच्याविरुध्द लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेश न येथे गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 8(क), 2(ब), भा. दं. वि. का. क. 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचा माल सप्लाय करणारे लोकांची फारमोठी साखळी असण्याची शक्यता आहे असा पोलीसांचा अंदाज असून त्या दृष्टीने तपास चालू आहे. अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.

सदरची कारवाई अंकीत गोयल (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण) व मितेश गट्टे (अपर पोलीस अधीक्षक, पुणे, पुणे ग्रामीण), सत्यसाई कार्तीक (सहाय्यक पोलीस अधीक्षक, लोणावळा विभाग लोणावळा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, सहा. पोलीस निरीक्षक देविदास करंडे, सहा. पोलीस उपनिरीक्षक युवराज बनसोडे, पो. ना. गणेश होळकर, पोलीस अंमलदार केतन तळपे, राहुल खैरे, प्रशांत तुरे यांनी कारवाई केली आहे.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्याला हादरवणाऱ्या ‘शिरगाव सरपंच हत्या’ प्रकरणी मोठी अपडेट! ‘त्या’ तीनही आरोपींची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता
– मावळ तालुक्यात पहिल्यांदाच 2 तहसीलदार; काले-कॉलनी व शिवणे मंडळमधील 60 गावांसाठी नवीन ‘अपर तहसीलदार’


dainik maval jahirat

Previous Post

देवता चित्रपटातील नायक, प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मावळ तालुक्यात मृत्यू! बंद घरात आढळला मृतदेह

Next Post

बालविवाह प्रकरणी पतीला अटक, मावळमधील धक्कादायक घटना! अल्पवयीन पत्नी 5 महिन्यांची गरोदर झाल्यानंतर प्रकार उघड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
child-marriage-crime

बालविवाह प्रकरणी पतीला अटक, मावळमधील धक्कादायक घटना! अल्पवयीन पत्नी 5 महिन्यांची गरोदर झाल्यानंतर प्रकार उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.