लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या सूचनेप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे आणि सत्य साई कार्तिक, सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग, लोणावळा यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रार निवारण दिनाचे उद्या (शनिवार, 19 नोव्हेंबर) रोजी आयोजन करण्यात आले आहे. ( Lonavala Rural Police Station Organize Grievance Redressal Day )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात सकाळी 11 वाजता, यापूर्वी अर्जदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जांच्या अनुषंगाने तक्रार निवारणाला सुरुवात होईल. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीच्या अर्जांचे निवारण होणार आहे. ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांनी दाखल तक्रारी अथवा गुन्ह्यासंबंधाटे सदर तक्रार अर्जातील अर्जदार आणि गैरअर्जदार यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन प्रांगणात हजर राहावे, असे आवाहन नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी : पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या इर्टिगा कारचा द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 3 गंभीर जखमी
– मुंढावरे ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्याचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश