कोरोना काळात कोलमडलेली एसटी बस सेवा आता पूर्वपदावर येत आहे. कोरोना काळात रद्द करण्यात आलेले वेळापत्रक टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून एसटी महामंडळ देखील विविध डेपोतून त्यांच्या सर्व ठिकाणच्या बस फेऱ्या पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशात कोकणातील अलिबाग आणि मावळ तालुक्यातील लोणावळा शहर या दोन्ही ठिकाणच्या मार्गावर असणाऱ्या विविध गावांतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ( Lonavala To Alibag ST Bus Service Resumes From Raigad Pen ST Bus Depo )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पेण एसटी बस डेपो आगारातून पेण – लोणावळा, लोणावळा – अलिबाग तसेच रात्री दहा वाजता सुटणारी पेण – खोपोली एसटी बस पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यात आली आहे.
पाहा वेळापत्रक;
पेण – लोणावळा
मार्ग: वाक्रुळ – वावोशी – बोरघाट – खंडाळा
सुटण्याची वेळ : सकाळी 5.30 वाजता
लोणावळा – पेण – अलिबाग
मार्ग : बोरघाट – खोपोली – वावोशी – वाकरुळ – पेण – वडखळ – पोयनाड – पेझारी – कार्लेखिंड
सुटण्याची वेळ : सकाळी 7.15 वाजता
हेही वाचा – महाराष्ट्रात आता महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत, योजनेची अमंलबजावणी सुरू
पेण – खोपोली
सुटण्याची वेळ : रात्री 22 वाजता (10 वाजता)
खोपोली – पेण
सुटण्याची वेळ : रात्री 23.30 वाजता (साडेअकरा)
तरी वरील सर्व फेऱ्यांचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास सहकार्य करावे, अशी विनंती महामंडळ आणि डेपोकडून करण्यात आली आहे. ( माहिती स्त्रोत – आदित्य भगत )
अधिक वाचा –
– अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला अल्टा कंपनीकडून मोठी मदत; वॉटर रेस्क्यू ऑपरेशन होणार अधिक जलद
– सावधान, तो परत येतोय! महाराष्ट्रात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय, मुंबई-पुणे भागात परिस्थिती चिंताजनक