जागतिक चिमणी दिनाचे औचित्य (20 मार्च) साधून मावळ तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या जिल्हा परिषद मोरवे शाळेकडून अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. शाळेचे कार्यशील मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी ‘पक्ष्यांना अन्नपाणी’ ही संकल्पना मांडून प्रत्येक विद्यार्थ्यांनी घरावर अथवा घराच्या परिसरात असलेल्या झाडावर मडके, प्लॅस्टिकचे किंवा इतर भांडे बांधून त्यामध्ये नियमित पाणी भरून ठेवणे, पक्ष्यांना धान्य ठेवणे आदी कृती करायला सांगितली. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठे कुतुहल निर्माण झाले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जागतिक चिमणी दिनी मोरवे शाळेत या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन पोलिस पाटील संतोष मानकर, लहु गोणते, दिपक फाटक, सोनु वांजळे, बाबू भिकुले, तनिष्का प्रेरणा प्रतिष्ठान च्या अध्यक्षा अन्नपूर्णा पाखरे इत्यादी उपस्थित होते. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी या उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी यावेळी केले. ( World Sparrow Chimani Day Celebrated At Zilla Parishad School Morve Village In Pavanmaval Division Of Maval Taluka )
हेही वाचा – बालपण समृद्ध करणारी, चिऊताई…! तुझ्यासाठी दोन ओळी । World Sparrow Day
खरेतर मागील बारा वर्षांपासून सर्जेराव पाखरे हा उपक्रम राबवत आहेत. सध्या मोरवे शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सर्जेराव पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेकडून अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामुळे पाखरे यांना आजवर शासन आणि सामाजिक संस्थाकडून विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– अवकाळीने आणली अवकळा! पवनमावळातील शिळींब, मोरवे, चावसर, तुंग गावांतील शेतकरी संकटात; वीट व्यावसायिकांचेही नुकसान
– PHOTO : मनीषा वाणी ठरल्या ‘सौभाग्यवती मावळ 2023’, तळेगावात ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती