प्रत्येकाच्या बालपणापासूनची संगत असणारी चिऊताई हळूहळू नामशेष होताना दिसू लागली आणि ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव होऊन 2010 सालापासून 20 मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा करण्याल सुरुवात झाली.
चिऊताई… जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचीच ती बहीण. तीच्या कविता, गाणी, गोष्टी ऐकत बोलत आपण सर्व मोठे झालो. मात्र, कालपरत्वे हाडामासांच्या नात्यात तिचं अस्तित्व कमी होत गेलं. आता मात्र आपल्या या ताईच्या जीवनमरणाचाच प्रश्न निर्माण झालाय. खरं तर तीने कधी कुणाला त्रास दिला नाही, किंबहुना ती देतही नाही. आपण कुणाच्या वाटे जाऊ नये आणि आपल्या कुणी, हाच तिचा स्वभाव.
एरवी माणसाने साधा तिला स्पर्श जरी केला, तरी तीला कळपात राहणं मुश्किल, त्यामुळे तिचं धोरण नेहमी अलिप्तपणाचं किंवा तिच्या कळपातलं. माणसाला मात्र तिच्या वेग आणि रंगाचं नेहमीच आकर्षण राहिलं. त्यातूनच तिचं सदैव कौतूक. तिनेही मग कथा, गाण्यातून त्याची परफेड केलीच. तरीही आज तिच्या अस्तित्वाचा प्रश्न का उभा ठाकला असावा बरं..? ( World Sparrow Day 20th March Chimani Divas )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एकेकाळी गावागावांत चिमण्यांचा कळपचा कळप दिसून यायचा. हल्ली ते प्रमाणही कमी झालंय. खरंतर माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी ओळख असलेली चिमणी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. माणसांच्या बदलत्या जिवनशैलीत, ना आता चिमणीसाठी अंगण राहिलंय, ना घराभोवती झाडं आहेत, ना वळचणी.. त्यामुळे आपल्या घरांमध्ये तिच्या घरट्यासाठी छोटीशी जागाही उपलब्ध होत नाही, हे वास्तव आहे.
त्यामुळेच जागतिक चिमणी दिवस याची गरज सर्वांनीच समजून उमजून घेत हा दिवस साजरा करायला हवा. जागतिक चिमणी दिनी नागरिकांनी चिमणी वाचवण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील महत्त्व समजावून घेणे आणि इतरांना सांगणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे, अशा प्रकारचे कार्यक्रम वैयक्तिक आणि संस्थात्मक स्तरावर करणे आवश्यक आहे. आणि फक्त 20 मार्चच नाही तर चिऊताईच्या रक्षणासाठी कायमस्वरुपी जनजागृती करणे गरजेचे आहे.
संपादकीय
दैनिक मावळ
अधिक वाचा –
– आमदार साहेब, इकडे लक्ष कधी देणार? कदमवाडी ते लंकेवाडीपर्यंतचा रस्ता नामशेष होण्याच्या मार्गावर, लाखोंचा फंड कचऱ्यात जाणार?
– मावळकरांना गुडन्यूज..! सोमाटणे टोलनाक्यावर फास्टॅगमधून कट झालेले पैसे परत मिळणार, आयआरबीचे पत्र, लगेच वाचा