व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

IPS सत्यसाई कार्तिक यांच्या कारवाईचा धडाका सुरूच; डीजेच्या तालावर अश्लील नृत्य सुरु असलेल्या बंगल्यावर मध्यरात्री टाकला छापा

लोणावळा शहराजवळील कुरवंडे (ता. मावळ) याठिकाणी एका खासगी बंगल्यात कर्नकर्कश आवाजात डीजे लावून सोबत आणलेल्या बारबालांसह अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या दहा जणांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 2, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Lonavla-City-Police-Station

Photo Courtesy : File Photo : Lonavla City Police Station


लोणावळा शहराजवळील कुरवंडे (ता. मावळ) याठिकाणी एका खासगी बंगल्यात कर्नकर्कश आवाजात डीजे लावून सोबत आणलेल्या बारबालांसह अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या दहा जणांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये बंगला मालक, बंगला चालक व केअर टेकर यांनादेखील आरोपी करण्यात आले आहे. शनिवारी(दिनांक 1 एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ( Lonavla police led by IPS Sathyasai Karthik raided a bungalow in Kurwande where obscene dance was going on )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीद्वारामार्फत बातमी मिळाली की, मौजे कुरवंडे ता. मावळ जि. पुणे गावाच्या हद्दीत शर्मा व्हिला या खाजगी बंगल्यात बरेच लोक सार्वजनिक शांततेचा भंग होईल, असे साऊंड सिस्टीम लावुन मोठमोठ्याने गाणी वाजवत अश्लिल हावभाव करीत बारबालांना नाच करायला लावत आहेत. सदर बातमी मिळाल्याने आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी आपल्या पोलीस स्टाफ यांच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला.

त्यावेळी सदर ठिकाणी शिवाजी रामचंद्र भोसले (वय 50 वर्षे, रा. पंढरपुर रोड, ता. सांगोला, जि. सोलापुर), अभिजीत मच्छिंद्र सोनलकर (वय 37 वर्षे, रा. वंदे मातरम चौक, सांगोला, जि. सोलापुर), धनाजी अर्जुन जगताप (वय 37 वर्षे, रा. कडलस नाका, ता. सांगोला, जि.सोलापुर), संतोष नामदेव शिंदे (वय 48 वर्षे, रा बलवडी, ता सांगोला, जि सोलापुर), प्रविण चंद्रमोहन पैलवान (वय 48 वर्षे, रा.वझराबाद पेठ, सांगोला, जि सोलापुर) आणि फिरोज जहांगीर तांबोळी (वय 45 वर्षे, रा. भवानी चौक, सांगोला, जि सोलापुर) या सहा जणांसह 4 महिला अश्लिल हावभाव करीत नाचत असल्याचे मिळून आल्या.

हेही वाचा – मावळ तालुका हादरला..! शिरगाव गावचे राष्ट्रवादीचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांची भरचौकात हत्या

पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर लोणावळा शहर पोलीस स्टेशन विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वरील गुन्ह्यास सहाय्य करणारे बंगाला मालक श्रेयश शर्मा (रा. मुंबई) सदरचा बंगला भाड्याने घेऊन चालविणारे लक्ष्मण दाभाडे (रा. लोणावळा), बंगल्याचा केअर टेकर कैलास पवार (रा. खंडाळा, लोणावळा) आणि गुरु पाटील (रा. तुंगार्ली, लोणावळा) यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

ही कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक आणि त्यांच्या पथकातील पो.हवा. अंकुश नायकुडे, जयराज पाटणकर, म.पो.हवा. आशा कवठेकर, चा.पो.शि. अंकुश पवार, पो.शि. सुभाष शिंदे, मनोज मोरे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो. नि. सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. जयराज पाटणकर हे करीत आहेत.

अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पहाटेच्या अंधारात अपघात, ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि…
– बेबडओहोळ गावात घरोघरी येणार जलगंगा; तब्बल 4 कोटी 91 लाखाच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन


Previous Post

मोठी बातमी : जळगावमध्ये पुतळ्याची नासधूस केल्याने दोन गटात राडा, 12 जणांना घेतले ताब्यात

Next Post

वडगाव फाट्यावरील सिल्वर ट्रेझर सोसायटीच्या परिसरात भीषण आग; आपदा मित्राच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अपघात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Fire-Broke-Out-Vadgaon-Maval

वडगाव फाट्यावरील सिल्वर ट्रेझर सोसायटीच्या परिसरात भीषण आग; आपदा मित्राच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
girl-dies-after-drowning

इंदुरी येथे इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून तरूणीची आत्म’हत्या

February 27, 2026
Strict measures to prevent accidents on highways Strict action against drunk drivers said Transport Minister

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना ; दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई – परिवहन मंत्री

February 27, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

“वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा–बारवर कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार”

February 27, 2026
Dilip Dhore unanimously elected as group leader of Panchayat Samiti Maval in NCP meeting

Maval NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पंचायत समिती मावळच्या गटनेतेपदी दिलीप ढोरे यांची एकमताने निवड

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.