येत्या रविवारी म्हणजेच दिनांक 18 डिसेंबर रोजी मावळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकांचे मतदान होणार आहे. यात लोणावळा विभागातील वरसोली, देवळे आणि कुनेनामा या गावांचा समावेश आहे. त्यामुळे मतदानाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे या तीनही गावांतून रूट मार्च काढला आणि नागरिकांमध्ये जनजागृती केली. ( Lonavla Police Route March In Varsoli Devale And Kunenama Village )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
निवडणूका या भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलिसांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असतो. अशात रविवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, लोणावळा विभागाचे विभागीय पोलिस उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात वरसोली, देवळे आणि कुनेनामा या गावांत पोलिसांनी रूट मार्च काढला. यावेळी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, एपीआय सचिन राऊळ, संदेश बावकर आदींसह दोन्ही पोलीस स्टेशनचे कर्मचारी, होमगार्ड यांनी सहभागी झाले होते.
मतदान केंद्र आणि परिसरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये आणि मतदानांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, असे झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्च मधून देण्यात आला. तसेच, नागरिकांनीही भयमुक्त होऊन मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवानही पोलिसांकडून करण्यात आले.
अधिक वाचा –
– दुग्धालय, कुक्कटपालन किंवा शेळीपालन; पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी ‘या’ लिंकवर करा ऑनलाईन अर्ज
– इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आवेदनपत्र भरण्यासाठी डिसेंबरच्या ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ