Dainik Maval News : ‘पर्व आरोग्य क्रांतीचे, संकल्प निरोगी मावळचा’, असे म्हणत आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून दिनांक 19 सप्टेंबर पासून महाआरोग्य शिबिर राबविण्यात येत आहे. दरवर्षी आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर आयोजित केले जाते. यंदा माय माऊली ज्येष्ठ नागरिक संघ मावळ, श्री विठ्ठल परिवार मावळ, कुलस्वामिनी महिला मंच मावळ या संस्थांच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयात सुरु आहे.
आता या शिबिराला एक आठवडा पूर्ण होत आला असून यादरम्यान नागरिकांचा मोठा प्रतिसाद शिबिराला मिळाला आहे. शिबिरात आरोग्याची संपूर्ण तपासणी व उपचार करण्यासाठी मावळच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असून दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आरोग्य तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे आमदार सुनिल शेळके यांच्या या आरोग्य शिबिराची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
याबाबत बोलताना आमदार सुनिल शेळके म्हणाले की, ‘मायबाप जनतेचा आशीर्वाद सदैव पाठीशी असल्याने, प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद आम्हाला मिळते. मायबाप जनतेचा हाच विश्वास आणि प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, जो आम्हाला लोकहितासाठी अहोरात्र कार्य करण्यास प्रवृत्त करतो. सर्वांची मनापासुन साथ हा जनसेवेच्या प्रवासातील सर्वात मोठा आधार आहे, आणि तुमच्या याच विश्वासाला पात्र राहण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमाला 2024 च्या अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर यांची निवड । Vadgaon Maval
– महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, पाहा वेबसाईट । Pune News
– संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन । Pune News