डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त कामशेत येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ( Mahaparinirvan Diwas 2022 Blood donation camp At Kamshet )
येत्या 6 डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्या निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष समीर जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कामशेत शहर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी हजेरी लावली होती. रक्तदानानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
अधिक वाचा –
– भाजपाच्या आंदोलनाला यश; जुलै 2023 पर्यंत भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम पूर्ण होणार
– महत्वाची बातमी! शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे..’ शब्द वापरल्यास कारवाई होणार, देहू संस्थानचा इशारा