विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) यांचा स्मृतीदिन म्हणजे महापरिनिर्वाण दिन . ( Mahaparinirvan Diwas 2022 ) दिनांक 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त तळेगाव शहर भारतीय जनता पार्टीकडून ( Talegaon Dabhade BJP ) पक्ष कार्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. ( Mahaparinirvan Diwas 2022 Greetings To Babasaheb Ambedkar From BJP Talegaon Dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण राज्यभरातून भीमअनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर दाखल झाले होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे यंदाचे हे 66वे वर्ष. राज्य सरकारनेही 2024 च्या आता बाबासाहेबांचे भव्य स्मारक बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
तळेगाव दाभाडे शहरात विविध पक्ष, संघटना यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रविंद्र माने आणि इतर सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी बाबासाहेबांचे प्रतिमापूजन करत त्यांना अभिवादन केले.
अधिक वाचा –
– महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : ‘स्वतःला भाई समजत असाल, तर..’, संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज, वाचा
– खळबळजनक! मावळ तालुक्यात महिला सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक