महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची अंतिम तारिख जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 21 मे रोजी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? याबद्दल चर्चा होत होती. अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी अर्थात 27 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. मार्च महिन्यात दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. आज (दि. 25 मे) शिक्षण मंडळाने या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. ( Maharashtra Board 10th Exam 2024 Result Date Announced SSC Exam 2024 Result on May 27 at 1 PM )
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत मार्च 2024 महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना सोमवारी दुपारी 1 वाजता त्यांचा निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे.
दहावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट – mahresult.nic.in
एसएससी निकाल 2024 पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना वरील वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव वापरून एसएससी निकाल 2024 तपासू शकतात.
अधिक वाचा –
– शाब्बास आर्यन ! लोणावळ्याचा आर्यन दळवी गणित विषयात राज्यात प्रथम, अभिनंदनाचा होतोय वर्षाव । Lonavala News
– पाण्यात स्टंट करणे जीवावर बेतले, महाविद्यालयीन तरूणाचा तळेगाव येथील तलावात बुडून मृत्यू । Talegaon Dabhade
– शिक्षणाला वय नसते.. मावळमध्ये 58 वर्षांच्या आजीबाई झाल्या बारावी पास ! मार्क पाहून तुम्हीही म्हणाल, आज्जी ‘अभिनंदन’