राज्य मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला मंजूरी दिल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा आणि शिंदे सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आज (गुरुवार, 9 मार्च) विधानसभेत सादर केला. यावेळी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. यंदाचा अर्थसंकल्प हा पाच ध्येयांवर आधारित म्हणजेच पंचामृत अर्थसंकल्प असेल असे सांगत देवेंद्र फडवीस यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाच्या संबंधित अर्थसंकल्पातील तरतुदींचे वाचन करत असताना मोठी घोषणा केली. जन सामान्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या कमाल मर्यादेत शिंदे सरकारकडून वाढ करण्यात येत असल्याचे फडणवीसांनी सांगितले. महात्मा फुले आरोग्य योजनेची वर्षभरातील मोफत उपचारांची कमाल मर्यादा ही दीड लाखांवरून 5 लाखांवर रुपये करण्यात येत असल्याची घोषणा फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून केली. तसेच आरोग्य विभागासाठी एकूण 3,520 कोटी रुपये जाहीर करण्यात आले. ( Maharashtra Budget 2023 Live Updates Devendra Fadnavis Increase Mahatma Phule Jan Arogya Yojana Treatment Amount )
महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कमाल मर्यादेत वाढ करण्यासोबतच राज्यातील नवीन 200 रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात येणार असून मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 4 लाखापर्यंत लाभ मिळेल. तसेच राज्यभरात 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येईल, असेही घोषित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 सध्या मुंबईत सुरु आहे. आज (गुरुवार, 9 मार्च) रोजी अधिवेशनाचा सातवा दिवस होता. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. तसेच, दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला. फडणवीस यांनी अर्थसंकल्प तयार करताना जनतेच्या सूचना मागवल्या होत्या, तसेच अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता, त्यामुळे अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
अधिक वाचा –
– ‘महा’बजेट 2023 : फडणवीसांचे मोठे गिफ्ट, शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ जाहीर, वर्षाला मिळणार ‘इतके’ पैसे
– आदिम कातकरी सेवा अभियान : दहिवली येथील आदिवासी बांधवांना आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून घरपोच जातीचे दाखले