महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज (मंगळवार, दिनांक 13 जून) मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ( maharashtra cm eknath shinde dcm devendra fadnavis government cabinet meeting read decision )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निर्णय खालीलप्रमाणे;
- सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार सुधारित दराने तत्काळ मदत करणार आहे. यासाठी 1500 कोटी रुपयांस मान्यता देण्यात आली आहे.
- कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे त्यांना आता मिळणार 16 हजार रुपये मिळणार आहे.
- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
- पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
- लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार असल्याचा निर्णय सरकारने घेतलाय.
- पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार, हा मोठा निर्णय सरकारने घेतलाय.
- अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ देणार.
- मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना आणण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.
- स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.
- चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार, हा एक निर्णय सरकारने घेतला आहे.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.#मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे :
✅ सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित… pic.twitter.com/G4qXJs7yY5
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 13, 2023
अधिक वाचा –
– अखेर प्रयत्नांना यश!! पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसला आणखीन 2 डब्यांची जोड, रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केला आनंद
– “वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक, वारीच्या इतिहासात असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं”