महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी मुंबईत पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यात पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासह इतर अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमिनीचे वाटप होणार
राज्यातील पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन देखील वाटप करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 सुधारणा अधिनियम 2012 मधील मार्गदर्शक सूचना 9.3 मध्ये संदर्भ क्र.2 अन्वये खंडकरी शेतकऱ्यास 1 एकर पेक्षा कमी क्षेत्र परत करावे लागत असल्यास असे क्षेत्र परत करण्यात येऊ नये अशी सुधारणा करण्यात आली होती.
मात्र, माजी खंडकरी शेतकरी यांच्याकडून सातत्याने होणारी मागणी लक्षात घेता 1 एकरापेक्षा कमी क्षेत्र देय असल्यास देखील त्याचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम 1947 अन्वये निश्चित केलेले किमान प्रमाणभूत क्षेत्राचे उल्लंघन न करता शेतकऱ्यास देय क्षेत्र वाटप करावे असे ठरले.
हेही वाचा – महाराष्ट्र सरकारची मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’, मुलींना करणार लखपती! वाचा काय आहे योजना?
मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व निर्णय ;
- राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती. ( महिला व बालविकास)
- सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार. (जलसंपदा विभाग)
- सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये (विधि व न्याय विभाग)
- पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन मिळणार. (महसूल विभाग)
- फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार (परिवहन विभाग)
- भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन (महसूल व वन विभाग)
- विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता (उच्च व तंत्र शिक्षण)
अधिक वाचा –
– भाजपाचे ‘घर चलो अभियान’, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मावळ लोकसभा दौऱ्यावर, पदाधिकारी-सुपर वॉरिअर्सशी साधणार संवाद
– तुंग गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना 1100 केशर आंब्याची रोपे वाटप
– शिवसेना ठाकरे गटाकडून वडगाव शहरात ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम