व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपाचे ‘घर चलो अभियान’, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मावळ लोकसभा दौऱ्यावर, पदाधिकारी-सुपर वॉरिअर्सशी साधणार संवाद

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात बुधवार 11 ऑक्टोबर रोजी ते पश्विम महाराष्ट्रातील मावळ लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 11, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Chandrashekhar-Bawankule

File Photo : Chandrashekhar Bawankule


भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात बुधवार 11 ऑक्टोबर रोजी ते पश्विम महाराष्ट्रातील मावळ लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील (पुणे व रायगड जिल्हा) सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील व ‘संपर्क से समर्थन’ अभियानात भाग घेणार आहेत. ( BJP state president Chandrashekhar Bawankule visit to Maval Lok Sabha )

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. बुधवारी दुपारी 12.15 वा. पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत व पनवेल आणि दुपारी 4.00 वा. चिंचवड येथील राधा लॉन्स काळेवाडी येथे पुणे जिल्ह्यातील पिपंरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच ‘सुपर वॉरिअर्स’ यांच्याशी संवाद साधतील.

सकाळी 11.00 वा. पनवेल येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कर्मवीर भाऊराव पुतळा चौकपर्यंत आणि सायं 6.00 वा. चिंचवड येथे शगून चौक ते साई चौकपर्यंत ‘घर चलो अभियानात सहभागी होतील व सर्वसामान्य जनतेशी हितगुज करणार आहेत. यासोबतच ते लोकसभा मतदारसंघातील येथील काही महत्वाच्या व प्रतिष्ठीत व्यक्तींच्या स्नेह भेटी घेणार आहेत.

प्रदेश अध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, राज्य लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, लोकसभा निवडणूक प्रमुख आ. प्रशांत ठाकूर, रायगढ उत्तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष शंकर जगताप, आ. अश्विनी जगताप, परेश ठाकूर, अरुणशेठ भगत, दीपक बेहेरे, नामदेव ढाके, शीतल शिंदे, तुषार हिंगे यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.

मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर
अधिक वाचा –
– दिलासादायक बातमी! जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांसाठी उद्याचा दिवस ठरणार निर्णायक? वाचा सविस्तर
– शिवसेना ठाकरे गटाकडून वडगाव शहरात ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम
– वडगावात रास दांडिया गरबा 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ; मोरया महिला प्रतिष्ठानचा उपक्रम


dainik maval jahirat

Previous Post

महाराष्ट्र सरकारची मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’, मुलींना करणार लखपती! वाचा काय आहे योजना?

Next Post

तुंग गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना 1100 केशर आंब्याची रोपे वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mango-seedlings-Distribute

तुंग गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना 1100 केशर आंब्याची रोपे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.