आमदार सुनिल शेळके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनरल मोटर्स कामगार युनियनचे अध्यक्ष संदिप भेगडे यांच्यासमवेत आज (मंगळवार, दि. 10 ऑक्टोबर) मंत्रालयात भेट घेतली. तळेगाव दाभाडे एमआयडीसीतील जनरल मोटर्स कंपनीमधील एक हजार कामगार कुटुंबासह त्यांच्या न्याय व हक्कांसाठी मागील सात दिवसांपासून ‘बेमुदत साखळी उपोषण’ करत आहेत.
कंपनीने कामगारांसोबत करार कशा पद्धतीने केले आहेत. कामगारांच्या काय मागण्या आहेत, याची सविस्तर माहीती देऊन या एक हजार कामगार बांधवांना योग्य न्याय मिळावा, ही मागणी आमदार शेळकेंनी उपमुख्यमंत्र्यांकडे यावेळी केली.
याची तात्काळ दखल घेत उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कंपनी व्यवस्थापन, कामगार मंत्रालयाचे प्रधान सचिव, एमआयडीसीचे अधिकारी, कामगार आयुक्त इ. यांच्यासमवेत उद्याच बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस @Dev_Fadnavis यांची तळेगाव दाभाडे एमआयडीसीतील जनरल मोटर्स कंपनीमधील एक हजार कामगारांच्या मागण्यांसंदर्भात कामगार युनियनचे अध्यक्ष श्री.संदिप भेगडे यांच्यासमवेत मंत्रालयात आज भेट घेतली.
#maval #midc #generalmotors pic.twitter.com/xLnbDZAVqw— Sunil Shelke (@shelkesunilanna) October 10, 2023
त्यावर “उद्याचा दिवस कामगारांच्या भविष्यासाठी निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा बाळगतो.” असे आमदार शेळके म्हणाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– जनरल मोटर्स कामगारांचे उपोषण : ‘कामगार उद्ध्वस्त होत आहेत, नेत्यांना थोडी लाज वाटली पाहिजे’ – विजय वडेट्टीवार
– मुख्यमंत्र्यांची घोषणा! आरोग्य विषयक व्हिजन 2035 जाहीर; नवीन रुग्णालये उभारणार, आरोग्यावर दुप्पट खर्च करणार
– शिवलीतील माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा ऋणानुबंध सोहळा संपन्न; शाळेला केली मोठी आर्थिक मदत