श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय शिवली (ता. मावळ) विद्यालयामध्ये सन 2004 बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तथा ऋणानुबंध सोहळा सोमवार (दिनांक 9 ऑक्टोबर) रोजी संपन्न झाला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ज्यांच्यामुळे आपण घडलो त्या गुरुजनांचा सन्मान केला. ( Alumni Gathering At Chhatrapati Shivaji Secondary School Shivali Maval )
कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव सर आणि सर्व शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचा देखील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणी म्हणून शाळेत येणाऱ्या पोषण आहाराचा आस्वाद घेतला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्याचप्रमाणे शाळेच्या विकासासाठी शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित मिळून विद्यालयासाठी रुपये 50 हजार इतकी देणगी बहाल केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवली गावचे पोलीस पाटील संदीप आडकर यांनी केले. त्याचप्रमाणे जाधव सर, गटकळ सर, जगदाळे सर या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– जनरल मोटर्सच्या कामगारांचे उपोषण : ‘सरकारला कामगारांचे देणे-घेणे नाही, स्वतःचे हित जपण्यात सरकार व्यस्त’ – रोहित पवार
– मोठी बातमी! लोणावळ्यातील टाटा धरणात बुडून दोन नेपाळी तरुणांचा मृत्यू । Lonavala News
– महाराष्ट्राची कुस्तीपटू क्षितिजा मरागजे हिची मध्यप्रदेशात झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची कामगिरी