लोणावळा शहराजवळील टाटा डॅम धरणात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवार (दि. 8 ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास घडली. दुपारी दोन वाजता तीन युवक लोणावळा लेक जवळ गेले होते. त्यापैकी दोघेजण पोहत असताना पाण्यात बुडाले. मुळचे नेपाळचे असलेले हे युवक ज्यांना पाण्यामध्ये खोल डक्ट लाईन असल्याची माहिती नव्हती. त्यामुळे पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. ( Breaking News Two Nepali youths died after drowning in Tata Dam in Lonavala )
विवेक छत्री (वय 21, रा. ओळकाईवाडी, मुळ नेपाळ) आणि करण कुंवर (वय 20, रा. ओळकाईवाडी, मुळ नेपाळ) अशी मृत पावलेल्या दोन्ही तरुणांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्रची रेस्कू टीम घटनास्थळी दाखल झाली. तसेच लोणावळा शहर पोलिसचे कर्मचारी शिंदे साहेब हेही टीम बरोबर होते. महादेव भवर आणि महेश मसने यांनी दोन्ही मृतदेह पाण्यातून शोधून बाहेर काढले. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान हे शोधकार्य संपले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अजय शेलार, महेश मसने, सागर कुंभार, मनोहर ढाकोल, राजेंद्र कडु, प्रणय अंबुरे, अनिल आंद्रे, चंद्रकांत बोंबले, अमोल परचंड, अनिकेत आंबेकर, अमोल सुतार, दक्ष काटकर, आयुष वर्तक, दुर्वेश साठे, महादेव भवर, रतन सिंह, अशोक उंबरे, सुनील गायकवाड, ब्रिजेश ठाकुर, मयुर दळवी, साहिल भिकोले, निहाल दळवी, आकाश घरदाळे, कैलास दाभणे, दिंपाशु तिवारी, वैभव दुर्गे अशी शिवदुर्गची टीम या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झाली होती. लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांची टीमही घटनास्थळी होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– एकता प्रतिष्ठाण डोणे आयोजित श्री डोणुआई देवी नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी चैत्राली लांडगे यांची निवड
– धक्कादायक! सुनेकडून सासूला बेदम मारहाण, महाराष्ट्रातील संतापजनक प्रकार, घटना सीसीटीव्हीत कैद – Viral Video
– कान्हे सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणूकीत अनिल मोहिते बहुमताने विजयी