मावळ तालुक्यातून लाचखोरीची प्रकरणे सातत्याने समोर येत असल्याची दिसत आहेत. अधिकारी, कर्मचारी नागरिकांना वेठीस धरुन कामाच्या बदल्यात लाच मागत असल्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहे. मागील आठ दिवसात लाचलुचपत विभागाने तीन कारवाया केल्याने मावळ तालुक्यात सर्वांनाच धक्का बसला आहे. अशात ज्यांच्याकडे नागरिक आशेने आणि न्यायाच्या अपेक्षेने जातात त्या खाकी वर्दीतील अधिकाऱ्यानेही लाच मागितल्याचा प्रकार समोर आल्याने हे लाचखोरीचे ग्रहण कधी संपणार? असा सवाल नागरिक विचारत आहेत. ( case has been registered against a Lonavla rural police officer for demanding bribe of Rs 50000 )
याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक देविदास हिरामण करंडे यांच्यावर लाच मागणी 50,000 रुपये आणि पडताळणीमधील एकूण लाच मागणी 1,40,000 रुपये प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 23 सप्टेंबर 2023 ते दिनांक 26 सप्टेंबर 2023 दरम्यान हा गुन्हा घडला. याप्रकरणी आरोपी लोकसेवकावर लोणावळा शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अन्वये गुन्हा दिनांक 06 ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला यांच्या विरुद्ध माहे ऑगस्ट/2022 मध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्राचा तपास देविदास करंडे सहा. पोलीस निरीक्षक हे करत होते. करंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर गुन्ह्राचा अ फायनल पाठवण्यासाठी 50,000 रुपये लाच रक्कम मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे इथे दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी केली असता देविदास करंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या आणि त्यांच्या सोबतचे सहआरोपी यांचेविरुद्धच्या गुन्ह्राचा अ फायनल पाठविण्यासाठी पंचासमक्ष तक्रारदाराकडे त्यांचे 40,000/ रुपये आणि सहआरोपी यांचे 1,00,000 रुपये असे एकूण 1,40,000 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस उपअधीक्षक श्रीमती माधुरी भोसले, पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पो.ना. सुनिल सुराडकर, पो.शि. भुषण ठाकुर, पो.शि. रियाज शेख, चालक पो.हवा. दिपक दिवेकर, ला.प्र.वि. पुणे. आणि मार्गदर्शन अधिकारी अमोल तांबे पोलीस अधीक्षक – ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र. व श्रीमती शीतल जानवे अपर पोलीस अधीक्षक – ला.प्र.वि. पुणे) यांनी ही कारवाई केली.
“नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.” असे आवाहन नितीन जाधव (पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे) यांनी केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
– ठरलं तर..! महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष ‘मावळ लोकसभा’ निवडणूक लढवणार; वाचा काय आहे मनसेचा प्लॅन?
– काले-पवनानगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया कालेकर । Gram Panchayat Election