लोकसभा सार्वत्रिक निवडणूका आता काहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशात सर्वच पक्ष आघाड्या आपापल्या पद्धतीने निवडणूकांच्या तयारीला लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपण किती जागा जिंकू शकतो, याची गणिते जुळवत, इच्छुक उमेदवार यांची चाचपणी करत बैठकांचा सपाटा लावला आहे. अशात राज्यातील एक प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षानेही आगामी लोकसभा निवडणूका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यात ज्या लोकसभा क्षेत्रात मनसे निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे, त्यात मावळ लोकसभेचाही समावेश आहे. ( Maharashtra Navnirman Sena Party will contest Pune and Maval Lok Sabha constituencies )
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पूर्ण ताकदीनिशी लोकसभेच्या आखाड्यात यावेळी पक्षाला घेऊन उतरणार आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती. काही दिवसांपूर्वी सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी काही निरीक्षक देखील नेमण्यात आले होते. या निरीक्षकांनी जो अहवाल दिला त्यानुसार मनसे साधारण 25 लोकसभा मतदारसंघात निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे आणि मावळ लोकसभेवर पक्षाचे विशेष लक्ष
अमेय खोपकर यांनी मनसे मावळ आणि पुणे या दोन लोकसभा मतदारसंघांची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत आहेत. बारणे यावर्षी देखील याच मतदासंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादी, भाजपा असे इतर पक्षही लक्ष ठेवून आहेत. अशातच पुण्यात दिवसेंदिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद देखील वाढत आहे. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघात लोकसभेचा उमेदवार देण्यासाठी राज ठाकरे तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ओव्हळे आणि आढले बुद्रुक गावातील नागरिकांच्या पाणी समस्येवर विशेष योजना
– लोणावळ्यात मतदार नोंदणी अभियान! 4 दिवसांत 1600 जणांची नोंदणी, 8 ऑक्टोबरपर्यंत राबवले जाणार अभियान
– प्रसिद्ध लेखकाच्या मुलाची मावळ तालुक्यातील ‘या’ ठिकाणी आत्महत्या; अवघ्या 28व्या वर्षी संपवलं आयुष्य