लोणावळा शहरात भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा आणि लोणावळा शहराच्या वतीने भव्य मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. दिनांक 3 ऑक्टोबर रोजी या मतदार नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. एकूण 4 दिवस अर्थात 6 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान राबवले जाणार होते. मात्र, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आता 8 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी अभियान राबवले जाणार आहे. आतापर्यंत 1600 नागरिकांनी मतदार नोंदणी केल्याची माहिती मिळत आहे.
लोणावळा शहरातील युवक युवतींना मतदार नोंदणी करता यावी आणि मतदानाचा राष्ट्रीय हक्क पार पाडता यावा यासाठी लोणावळा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक भाजी मार्केट लोणावळा इथे हे अभियान राबवण्यात येत आहे. लोणावळा शहरातील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेऊन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी मावळ तालुका भाजपा अध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा शहर अध्यक्ष अरुण लाड, रामविलास खंडेलवाल, योगिता कोकरे, शौकतभाई शेख, शुभम मानकामे, अर्जुन पाठारे, हर्षल होगले, शेखर दळवी आदी प्रमुख उपस्थित होते. ( voter registration campaign by BJP in lonavla maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळमधील गुणवंत शिक्षकांचा जुन्नर इथे सन्मान, ‘शिक्षकांचे सर्व प्रश्न शासन दरबारी मार्गी लावणार’ – आमदार म्हात्रे
– 40 हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारी अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; मावळमधील धक्कादायक घटना
– महागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोरख डोंगरे यांची निवड । Gram Panchayat Election