वडगाव मावळ : लोहगड ग्रामपंचायतीमध्ये सोलार प्रकल्प कामाची ऑर्डर काढण्यासाठी येथील विस्तार अधिकाऱ्याला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने (Anti Corruption Bureau) रंगेहात अटक केली आहे. गुरुवार (दिनांक 5 ऑक्टोबर) रोजी दुपारी 3 वाजता मावळ पंचायत समिती कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. ( Extension Officer Has Been Caught In Trap Of ACB While Accepting Bribe Of 40 Thousand In Maval Taluka )
अंकुश किसन खांडेकर (वय 57) असे लाच प्रकरणी अटक केलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. खांडेकर यांच्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्राप्त माहितीनुसार, अंकूश खांडेकर हे मावळातील 17 ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून कार्यरत होते. लोहगड ग्रामपंचायतीमध्ये सोलार प्रकल्प कामाची ऑर्डर काढण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे तब्बल 40 हजारांची लाच मागितल्याचा आरोप होतो. कारवाई वेळी लाचलुचपत विभागाने (Anti Corruption Bureau) खांडेकरसह आणखी एकाला ताब्यात घेतले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– बिगुल वाजलं! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका जाहीर, 9 ऑक्टोबरपासून प्रक्रिया होणार सुरु
– स्तुत्य उपक्रम! वाढदिवसानिमित्त 50 आरोग्य कर्मचाऱ्यांना कपडे वाटप । Vadgaon Maval
– पंतप्रधान मोदींच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात वडगाव शहर भाजपाचा सक्रीय सहभाग; 7 टन कचरा संकलित