हॅन्ड इन हॅन्ड इंडिया आणि एस.एल.बी. कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने सिमेंट नाला बांध दुरुस्तीच्या कामाची सुरुवात मावळ तालुक्यातील ओव्हळे आणि आढले बुद्रुक येथे होणारे आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पावसाळ्यात मावळ तालुक्यात भरपूर पाऊस पडतो. पण उन्हाळ्यात येथील गावकऱ्यांना पाण्याची समस्या सतत भेडसावत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी आणि शेतीसाठी पाणी या प्रमुख समस्या आहेत. ( Hand in Hand India SLB company Plan on water problem in Owle Adhale Budruk village )
सिमेंट नाला बांध दुरुस्तीच्या कामामुळे या दोन्ही गावांची उन्हाळ्यातील पाण्याची समस्या सुटणार आहे. या उपक्रमासाठी एस.एल.बी. कंपनीच्या श्रेया सुधीर मॅडम आणि हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेचे कोंडा राधा कृष्णा, अनिल पिसाळ, पुरुषोत्तम एम. अभिजित अब्दुले आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. दोन्ही गावातील ग्रामस्थांनी श्रेया सुधीर मॅडमचे आणि हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेचे आभार व्यक्त केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे लगत सर्व्हिस रोड होणार? एमएसआरडीसीचे अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन
– मावळमधील गुणवंत शिक्षकांचा जुन्नर इथे सन्मान, ‘शिक्षकांचे सर्व प्रश्न शासन दरबारी मार्गी लावणार’ – आमदार म्हात्रे
– 40 हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारी अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; मावळमधील धक्कादायक घटना