काले-पवनानगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया प्रकाश कालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच उत्तम चव्हाण यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच खंडुजी कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी सरपंच खंडुजी कालेकर, उपसरपंच उत्तम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घरदाळे, अमित कुंभार, रमेश कालेकर, रंजना कालेकर, योगिता मोहोळ, फुलाबाई कालेकर, ग्रामसेवक रवींद्र वाडेकर यांच्यासह मावळ तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, सजन बोहरा, शक्ती जव्हेरी, विलास वरघडे, दत्तात्रेय कालेकर, विकास कालेकर, अजिंक्य कालेकर, प्रवीण कालेकर, दिनेश घरदाळे, संदीप कालेकर आदी उपस्थित होते. छाया कालेकर यांच्या निवडीनंतर गुलाल भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लोणावळ्यात मतदार नोंदणी अभियान! 4 दिवसांत 1600 जणांची नोंदणी, 8 ऑक्टोबरपर्यंत राबवले जाणार अभियान
– प्रसिद्ध लेखकाच्या मुलाची मावळ तालुक्यातील ‘या’ ठिकाणी आत्महत्या; अवघ्या 28व्या वर्षी संपवलं आयुष्य
– पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे लगत सर्व्हिस रोड होणार? एमएसआरडीसीचे अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन