यंदा दिनांक 1 ते 7 ऑक्टोबर या काळात देशभर वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी वनविभाग पुणे आणि मावळ तालुक्यातील वन्यजीव रक्षक संस्था संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यात गावोगावी फिरून विद्यार्थ्यांमध्ये वन्यप्राण्यांविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी वनविभागाचे अधिकारी, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, सदस्य जिगर सोलंकी यांनी मुलांना मावळ तालुक्यातील आढळणारे वन्यप्राणी आणि त्यांचे महत्व, तसेच मानवी जीवनावर त्या वन्यप्राण्याचे प्रभाव कसे आहेत, हे समजावून सांगितले. ( Forest Department and Wildlife Conservation NGO Jointly Created Awareness About Wild Animals In Maval Taluka )
7 दिवसांमध्ये वनविभाग शिरोता, वनविभाग वडगांव मावळ आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांनी तब्बल 15 गावांमध्ये जाऊन जनजागृती केली. यात कुणे नामा, देवघर, उक्सान, गोवित्री, साई, नानोली, नवलाख उंब्रे, निगडे, मळवली, कडधे, शिवणे, आढळे खुर्द, वडगांव मावळ, भोयरे, इंगळूण इत्यादी गावांचा समावेश आहे. वन्यजीव सप्ताह दरम्यान काही जखमी पशूपक्षी जसे की सांबर आणि 11 बगळे उपचारासाठी पाठवण्यात आले, तर काही साप, कासव, पक्षी यांना त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशील मांतावर, वनपाल एस.एस. बुचडे, पी.एम. रासकर, घुगे साहेब, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव वडगांव मावळ, वनपाल ए. हिरेमट, सी. चुटके, डी. दोमे आणि सर्व वनरक्षक आणि वनमजूर उपस्थित होते. तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, संतोष दहिभाते, संकेत भानुसघरे, शत्रुघ्न रसांकर, विकी दौंडकर, साहिल नायर उपस्थित होते. जर नागरिकांना कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळून आल्यास जवळपास असणाऱ्या प्राणीमित्राला किंवा वनविभागाला संपर्क (1926) करावा, असे आव्हान निलेश गराडे (9822555004) आणि अनिल आंद्रे यांनी केले.
“दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात जागतिक वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. नागरिकांमध्ये वन्यजीवांविषयी जनजागृती व्हावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. शालेय जीवनात वन्यजीवांचे महत्व समजले तर त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आपण यावर्षी जनजागृती करण्यासाठी मावळ तालुक्यातील शाळा आणि विद्यार्थ्यांना लक्ष्य केले. विशेष म्हणजे विद्यार्थी वर्गाकडून आम्हाला अप्रतिम प्रतिसाद मिळाला. याकामी आम्हाला मावळ वन्यजीव रक्षक संस्थेचा मोठा हातभार लाभला त्याकरिता त्यांचे देखील विशेष आभार” – सुशील मंतावार ( वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता)
“मावळ तालुक्यात सापांचे प्रमाण खूप जास्त आहे. तालुक्यात 36 जातीचे साप आढळून येतात. त्यातील 4 विषारी साप प्रामुख्याने मानव वस्तीमध्ये आढळून येतात. नाग, मण्यार , घोणस, फुरसे हे ते विषारी साप आहेत. वन्यजीव सप्ताह निमित्त डोंगराच्या शेजारी असणाऱ्या गावांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती करून त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात साफसफाई ठेवावी आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर जातांना पायात बुट आणि हातामध्ये टॉर्च असले पाहिजे. चुकून साप चावल्यानंतर घाबरून न जाता जवळ पासच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.” – जिगर सोलंकी (वन्यजीव रक्षक मावळ संस्था)
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ठरलं तर..! महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष ‘मावळ लोकसभा’ निवडणूक लढवणार; वाचा काय आहे मनसेचा प्लॅन?
– काले-पवनानगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया कालेकर । Gram Panchayat Election
– तळेगावात साडेतीन किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विभागाची कारवाई