राज्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत आहेत. अशात निवडणूक आयोगाने राज्यातील तब्बल 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक गावांत आता निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. पण एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणूका होत असताना दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका कधी जाहीर होणार? असा प्रश्न गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुक आणि ‘भावी’ उमेदवारांच्या मनात आहे. ( Maharashtra State Zilla Parishad and Panchayat Samiti Elections Problems and Analysis )
पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका का रखडल्या?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मात्र, त्यापूर्वी 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्याने अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण लागू करावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. तसेच महाविकासआघाडीच्या काळात तयार करण्यात आलेली वॉर्ड रचना बदलण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतला होता. या नव्या वॉर्ड रचनेलाही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलंय, त्यामुळे एकूणच ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महापालिका निवडणुका कधी होणार?
राज्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने आता महापालिका निवडणुका कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबादसह राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत उलटून गेल्यामुळे त्या विसर्जित झाल्या आहेत. त्यामुळे या महानगरपालिकांचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार, हा प्रश्नही या निमत्ताने विचारला जात आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– काले-पवनानगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया कालेकर । Gram Panchayat Election
– तळेगावात साडेतीन किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विभागाची कारवाई
– ओव्हळे आणि आढले बुद्रुक गावातील नागरिकांच्या पाणी समस्येवर विशेष योजना