महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्यांकरिता एक टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. प्रशासनातील कोणत्याही अडलेल्या कामासाठी, बिंदू नामावली, महसूलमधील विविध दाखले, रेशनकार्ड, आधार कार्ड, महा ई सेवा केंद्राच्या तक्रारी, निवृत्ती वेतन किंवा कोणत्याही अडवणुकीसाठी सदर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवता येऊ शकते. शासनाने 18001208040 टोल फ्री क्रमांक याकरिता उपलब्ध करुन दिला आहे.
कायद्यानुसार ग्रामसेवकामार्फत मिळणारे विविध दाखले, त्यासाठी लागणारा कालावधी आणि शुल्क याबाबत काही नियम आहेत. निर्धारीत शुल्कात आणि वेळेच्या आत जनतेला प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे. परंतू जर आपल्याला निर्धारीत वेळेत आणि शुल्कात सेवा मिळत नसल्यास 18001208040 या क्रमांकावर तक्रार करता येईल.
कायद्यानुसार महसूल विभागातर्फे मिळणाऱ्या सेवांचा कालावधी निश्चित आहे. महसूल अंतर्गत विविध सेवांचे शुल्क ठराविक आहे. त्यापेक्षा जास्त पैसे देऊ नका, असे सांगण्यात आले आहे. महा ई सेवा केंद्र आणि नागरी सुविधा केंद्रातून हे दाखले घेताना जास्तीचे पैसे देऊ नका, असेही आवाहन सामान्यांना आहे. तसेच शुल्काची पावती घ्यायलाही विसरु नका.
अतिरिक्त पैसे मोजून नागरिकाच्या खिशाला कात्री आता लागणार नाही. दलाली करणाऱ्यांना शंभर टक्के आळा बसेल नागरिकांना सावधान अतिरिक्त कोणी पैसे मागत असेल तर आपण ह्या हेल्पलाइनवर तक्रार करू शकता. कारण होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. ( Maharashtra Government Toll Free Number 18001208040 Know the Information )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– सातबाऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरजच नाही! घरबसल्या ऑनलाइन करा अर्ज, जाणून घ्या
– इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी संध्या थोरात; सोमाटणे इथे पार पडला पदग्रहण सोहळा । Talegaon Dabhade
– कामशेतमध्ये राहून ठाण्यातील लोकांची फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला कल्याण पोलिसांकडून अटक । Maval Crime News