व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सातबाऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरजच नाही! घरबसल्या ऑनलाइन करा अर्ज, जाणून घ्या

मंडळी तुम्ही जर शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातील असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्वाची आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 17, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल
online-varas-nond

Photo Courtesy : Team Dainik Maval


मंडळी तुम्ही जर शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातील असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्वाची आहे. जर एखाद्या कुटुंबात शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात, पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद करणं आवश्यक असतं. परंतू वारस नोंद करणं ही अत्यंत क्लिष्ट आणि सरकारी कार्यालयात खेटे मारायला लावणारी प्रक्रिया असते. मात्र आता या सर्व कटकटीपासून सामान्यांची सुटका होणार आहे.

कारण सातबारा उतारा असेल किंवा वारस नोंदणी करायची असेल किंवा जमिनी बाबतची अन्य काही कामं असतील, तुम्हाला सरकारी कार्यालयात किंवा तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला घरबसल्या जमिनी संदर्भातील वारस नोंदणी, वडिलोपार्जित जमीन, घर, जमीन नोंदणी अशी अनेक कामे ऑनलाईन करता येणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे तलाठी कार्यालयात न जाताही तुम्ही घरातूनच मोबाईलवर वारस नोंदीसाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज करू शकता. ( there is no need to go to talathi office to register heirs on Sat Bara Apply online from home know in details )

सरकारकडून सामान्यांना मोठा दिलासा…

शेतकऱ्यांच्या संदर्भातील अनेक गोष्टी आता सरकार सुलभ करताना दिसत आहे. त्या अनुषंगाने निर्णय घेताना दिसत आहे. यातच आता शासनाच्या महसूल आणि भूमी अभिलेख या दोन विभागांकडून एक ऑगस्टपासून एक सुविधा संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आली आहे. महाभूमी संकेतस्थळावर डिजीटल सातबारा तसेच ई फेरफार अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यावर नोंदणी केल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. ऑनलाईन अर्ज करून जमिनीचे काम दाखल करता येणार असून त्याची पडताळणीही ऑनलाईन होणार आहे. यात वारस नोंद करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.

अशी कराल ऑनलाईन वारस नोंद…

शासनाच्या महाभूमी संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला लॉगिन करावे लागणार आहे. त्यानंतर वारस नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल. ऑनलाईनच पेमेंट देखील करता येणार आहे. हा अर्ज तलाठ्याकडे जाईल. त्यानंतर तलाठी त्या अर्जाची ऑनलाईन पद्धतीने पडताळणी करेल. जर अर्जात कोणत्या कागदपत्रांची कमतरता असेल तर तुम्हाला त्याबाबत इमेलद्वारे कळवण्यात येईल. जर कागदपत्र पूर्ण असतील तर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यात येते.

वारस नोंदसाठी लागणारी कागदपत्रे…

  • मृत्यू दाखल्याची सत्यप्रत (ही प्रत ग्रामपंचायत कार्यालयात मिळते)
  • कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती देण्याकरता रेशन कार्डची प्रत
  • मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीचे 8 अ चे उतारे
  • एक शपथपत्र (यात मृत व्यक्तीच्या सगळ्या वारसांची नावे तसेच त्यांचा संपूर्ण पत्ता)

ऑनलाईन वारस नोंदसाठी समोरील लिंकवर क्लिक करा – bhulekh.mahabhumi.gov.in

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ मनसेत जोरदार इन्कमिंग! वडगाव शहर मनसे विद्यार्थी सेना अध्यक्षपदी ओंकार भांगरे तर उपाध्यक्षपदी ‘यांची’ निवड
– स्वातंत्र्यदिनी तिरंगा रॅली, ढोल-ताशाच्या गजरात स्वातंत्र्यसैनिकांची मिरवणूक, आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती । Vadgaon Maval
– हर घर तिरंगा – मेरी माटी मेरा देश – पंचप्रण शपथ । पवनानगरमधील पवना शिक्षण संकुलात देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा


Previous Post

काका-पुतण्याच्या भेटीने ठाकरे सावधान! पवारांविरोधात मावळात ‘पॉवर’ दाखवणार? वाचा नेमकं काय घडलंय…

Next Post

महागाव इथे पौष्टिक तृणधान्य पोषण मूल्य जनजागृती कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांना तृणधान्य विषयी मार्गदर्शन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Nutritional-Value-Awareness-Program

महागाव इथे पौष्टिक तृणधान्य पोषण मूल्य जनजागृती कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांना तृणधान्य विषयी मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.