व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी राज्य शासन 41 कोटी देणार; स्मारकाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येणार । Pimpri Chinchwad

शासनाकडून स्मारकासाठी 41 कोटी रुपयांचा निधी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. निधी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 22, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Krantivir-Chapekar-Bandhu

Photo Courtesy : Team Dainik Maval


क्रांतीवीर चापेकर बंधूंचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी निधी शासनाकडून देण्यात येईल. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. शासनाकडून स्मारकासाठी 41 कोटी रुपयांचा निधी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. निधी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

खासदार बारणे यांच्या पुढाकाराने सह्याद्री अतिथीगृहावर मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्मारकाच्या कामाला निधी देण्याची घोषणा केली. बैठकीस आमदार अश्विनी जगताप, महापालिका आयुक्त शेखर सिंह,चापेकर समितीचे गिरीष प्रभूणे,मिलिंद देशपांडे,रविंद्र नामदे,ॲड सतिष गोरडे, अमोल थोरात आदी उपस्थित होते. ( maharashtra government will give 41 crores for Krantivir Chapekar Bandhu Memorial at Pimpri Chinchwad )

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, चिंचवडगाव येथे क्रांतीवीर चाफेकर बंधुचा जुनावाडा ही पुरातन ऐतिहासिक वास्तु होती. हा वाडा मोडकळीस आल्यामुळे क्रांतीवीर चापेकर यांची पुरातन वास्तु नव्याने उभारण्यासाठी राज्य सरकारकडून 12 जून 1997 रोजी क्रांतीवीर चापेकर बंधुचे स्मारक उभारण्याबाबत पिंपरी – चिंचवड महापालिकेला आदेश प्राप्त झाले. त्यानुसार, सन 1997 मध्ये स्मारकाचे पहिल्या टप्प्याअंतर्गत फाऊंडेशन करण्यात आले. आपण 1997-98 मध्ये महापालिका स्थायी समितीचा अध्यक्ष असताना पहिल्यांदा 35 लाख रुपये दिले होते. चापेकर वाड्याची दुरुस्ती केली होती. त्यानंतर पालिकेने 12 कोटी रुपये खर्च करून वाड्याची काही कामे केली.

महापालिकेने सर्व खर्च करणे अपेक्षित असताना उर्वरित 41 कोटी रुपये खर्च करणे शक्य नसल्याचे महापालिकेने सांगितले. त्यामुळे राज्य सरकार कडून निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करून मंगळवारी बैठक आयोजित केली. बैठकीत चापेकर स्मारकाच्या कामासाठी आवश्यक 41 कोटी रुपयांचा निधी देण्याची विनंती केली. या कामामध्ये क्रांतिकारकांच्या जीवनावर माहिती दिली जाणार आहे. यासाठी 41 कोटी रुपये निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. नव्या पिढीला चापेकरांचे कार्य, इतिहास माहिती होणार आहे. स्मारकात काही समूह शिल्प असणार आहेत.

हेही वाचा – पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम मार्गी लागणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

ऐतिहासिक काळास साजेशी अंतर्गत सजावट!

स्मारकाच्या तिस-या टप्प्यातील दुस-या भागात करायच्या कामामध्ये ऐतिहासिक पुरातनकाळास साजेशी अंतर्गत सजावटीची विविध कामे आणि पहिल्या भागात राहिलेले आरसीसीचे काम प्रस्तावित आहे. यामध्ये प्रामुख्याने त्याकाळात वापरण्यात येणा-या वस्तु, भांडी, वेषभुषा अलंकार, युद्ध कलेचे साहित्य, तात्कालीन व्यक्तींचे पुतळे, पुरातन काळातील प्रसंगाचे म्युरल्स, गडकोट, किल्ले यांच्या प्रतिकृती, पुरातन भिंतीचित्रे आदी कामांचा समावेश असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

स्मारकाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार

गिरीश प्रभुणे यांनी स्मारकाच्या उभारणीची आतापर्यंतची वाटचाल मांडली. तसेच स्मारकाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी येण्यास मान्यता दिल्याचे सांगितले.

अधिक वाचा –
– ‘होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन’कडून महिला व बालकांसाठी मोफत विधी सेवा आणि मध्यस्थी चिकित्सालय कक्ष
– उमा खापरे, बाळा भेगडेंच्या उपस्थितीत लोणावळ्यात भाजपाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील ‘व्यापारी संमेलन’ संपन्न


dainik maval jahirat

Previous Post

‘तुटलेला चेंबर दाखवा आणि नवीन चेंबर बसवा’, मावळातील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाचा अभिनव उपक्रम

Next Post

मावळ तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी सोमनाथ कालेकर तर उपाध्यक्षपदी विठ्ठल पाठारे; पाहा संपूर्ण कार्यकारिणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-taluka-kotwal-association

मावळ तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी सोमनाथ कालेकर तर उपाध्यक्षपदी विठ्ठल पाठारे; पाहा संपूर्ण कार्यकारिणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.