Dainik Maval News : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवघर शाळेचे मुख्याध्यापक सुभाष ज्ञानदेव भानुसघरे (सर) यांना शैक्षणिक सामाजिक व आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील बहुमुल्य प्रेरणादायी अशा प्रबोधनाच्या कार्यासाठी महाराष्ट्र राज्य विश्वनाथ फाउंडेशन व इनफोडॅडच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे.
दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, पुणे येथे सकाळी 11 वाजता या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सुनील शेळके व अनेक मंत्री महोदयांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे मावळ तालुक्यात प्रथमच हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भानुसघरे सरांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, नातेवाईक मित्रमंडळी कडून अभिनंदन होत आहे. फाउंडेशनचे सचिव अँड. शंकरराव चव्हाण यांनी अशी माहिती दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ