शिवसेना पक्षाचे संस्थापक, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आजच्याच दिवशी म्हणजे 23 जानेवारी 1926 रोजी जन्म झाला होता. ‘एक व्यंगचित्रकार ते महाराष्ट्राच्या राजकारणातील कधीही न शमणारे वादळ’ असा बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास अनेक राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांमधून आपण तो समजून घेऊयात… ( Maharashtra Shiv Sena Party Founder Shivsena Chief Hindu Hridayasamrat Balasaheb Thackeray Life Journey )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बाळासाहेब ठाकरे यांच्या 86 वर्षांच्या आयुष्यातील काही महत्वाचे टप्पे
– 1926 : बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील केशव सिताराम ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे हे समाजसुधारक होते.
– 1955 : बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीची एक व्यंगचित्रकार म्हणून सुरुवात केली. इंग्रजी वृत्तपत्र द फ्री प्रेस जर्नलमध्ये ते कार्टून रंगवायचे.
– 1960 : बाळासाहेब आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी मार्मिक हे राजकीय व्यंगचित्रण करणारे मासिक सुरू केले.
– 19 जून 1966 : “प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या मराठी भाषकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या राजकीय पक्षाची स्थापना केली.”
– 1984 : शिवसेनेने हिंदूत्व या मुद्द्यावर भाजपासोबत युती केली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी शिवसेनेने भाजपाच्या सहाय्याने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली.
– 1989 : बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्राची स्थापना केली.
– 1992 : बाबरी मशिदीच्या पाडावाचे बाळासाहेबांनी समर्थन केले.
– 1995 : महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा युतीचे सरकार आले आणि शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले.
– 1996 : बाळासाहेबांचे सुपूत्र बिंदूमाधव ठाकरे यांचे 20 एप्रिल 1996 रोजी मुंबई-नाशिक हायवेवर अपघाती निधन झाले.
– 1999 : निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्षांसाठी मतदान करण्यावर बंदी घातली.
– 2004 : उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
– 2006 : राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्यांनी 9 मार्च 2006 साली स्वतंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली.
– 2009 : बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
– 2012 : तब्येत खालावल्याने बाळासाहेबांना मुंबईतील लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. 15 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. ( Mumbai Shiv Sena Party Founder Shivsena Chief Hindu Hridayasamrat Balasaheb Thackeray Life Journey )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! शरद पवार यांचा सर्वात जुणा आणि जवळचा सहकारी काळाच्या पडद्याआड
– पवना शिक्षण संकुलात वृक्षारोपण; कार्यक्रमादरम्यान आमदार शेळकेंची खास मागणी आणि मंत्री मुनगंटीवारांचे तात्काळ आश्वासन, वाचा
– मावळ, मुळशीतील नागरिकांसाठी गुडन्यूज! पुणे चक्राकार रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग, वाचा सविस्तर