महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवारी 21 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डकडून नुकतेच याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात निकालासंदर्भात आणि गुणपडताळणीच्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिकेची पडताळणी देखील करता येणार आहे. त्यासाठीची माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. ऑनलाईन निकालानंतर इयत्ता १२ वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी करता येईल.
2024 मध्ये महाराष्ट्रात 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. सीबीएसई आणि आयसीएसईने दहावी व बारावीचे निकाल जाहीर केल्यावर महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी सुद्धा निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. MSBSHSE नियमांनुसार बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण घोषित होण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी आणि तोंडी परीक्षांमध्ये मिळून किमान 35 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. ( maharashtra state board hsc 12th exam result date 2024 how to check result list for hsc marks )
निकाल साईटवर कसा तपासायचा?
* अधिकृत वेबसाइटला mahresult.nic.in वर भेट द्या.
* मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC, HSC निकाल 2024 लिंक तपासा.
* लॉग इन तपशील ऍड करून सबमिट वर क्लिक करा.
* एंटर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.
* निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.
पुढील वेबसाईटवर पाहता येणार निकाल –
– mahresult.nic.in
– http://hscresult.mkcl.org
– www.mahahsscboard.in
– https://result.digilocker.gov.in
– http://results.targetpublications.org
अधिक वाचा –
– अखेर वडगाव नगरपंचायत प्रशासन जागं झालं ! शहरातील सर्व होर्डींगची केली पाहणी, अनधिकृत होर्डिंग धारकांवर होणार कारवाई
– घोणशेत येथील जुगार अड्ड्यावर कामशेत पोलिसांचा छापा ! 11 जणांवर गुन्हा दाखल, रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त । Kamshet News
– आंदर मावळात विजेचा लपंडाव सुरुच ! नागरिक प्रचंड हैराण, एका अवकाळीने महावितरणला 440 व्होल्टचा झटका