Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकाल घोषित केला असून संपूर्ण राज्याचा निकाल 94.10 टक्के इतका लागला आहे. महत्वाचे म्हणजे यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचा संख्या सर्वाधिक आहे. मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने आपले निकालपत्र पाहता येणार आहेत.
निकाल जाहीर –
संपूर्ण राज्याचा निकाल – 94.10 टक्के
मुलींचा निकाल – 96.14 टक्के
मुलांचा निकाल – 92.31 टक्के
मागील वर्षापेक्षा निकालात 1.71 टक्क्यांची घट
पुढील अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल
1. https://results.digilocker.gov.in
2. https://sscresult.mahahsscboard.in
3. http://sscresult.mkcl.org
4. https://results.targetpublications.org
5. https://results.navneet.com
6. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
8. https://www.indiatoday.in/education-today/results
9. https://www.aajtak.in/education/board-exam-results
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता उपलब्ध होतील आणि सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. ( Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Class 10th Exam SSC Result 2025 Declared )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा ; छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांसाठी स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री
– कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती । Virat Kohli Retires
– लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावणार? ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्याची मनसेची मागणी । Pune Metro