महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयरे येथील तीन विद्यार्थ्यांचा जिल्हा गुणवत्ता यादीत समावेश झाला आहे. त्यांंच्या ह्या यशाबद्दल विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे सध्या सर्वच स्तरावरून अभिनंदन होत असून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये;
कु. किरण मानतेश भंडारी (254 गुण) केंद्रात-प्रथम, तालुक्यात-सातवा क्रमांक
कु.यज्ञेश काशिनाथ आडीवळे (240 गुण)
आणि कु. श्रेया गोरख जांभूळकर (232 गुण) यांचा समावेश आहे.
महत्वाची बाब म्हणजे वर्गातील 31 विद्यार्थ्यांपैकी 21 विद्यार्थी पात्र झाले असून 200 हून अधिक गुण मिळवणारे 9 विद्यार्थी आहेत. मार्गदर्शक शिक्षिका अर्चना गाढवे यांनी विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, सातत्याने अध्यापन, सराव परीक्षा घेतल्या. शिक्षक व पालक यांचे सहकार्य ह्यामुळे हे यश प्राप्त झाले, अशी प्रतिक्रिया वर्गशिक्षिका अर्चना गाढवे यांनी दिली. ( Maharashtra State Examination Council Final Result And Merit List Out Bhoyare ZP School 3 Students Included In District Merit List )
ह्या यशात तत्कालीन मुख्याध्यापक तानाजी शिंदे यांचेही कायम सहकार्य लाभले. शाळेच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक सुनील साबळे, शिक्षक संतोष गायकवाड, शांता विरणक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामभाऊ भोईरकर, उपाध्यक्ष राजू करवंदे, सरपंच वर्षा भोईरकर, उपसरपंच हृषिकेश खुरसुले, माजी सरपंच बळीराम भोईरकर, माजी केंद्रप्रमुख / वि. अधिकारी कृष्णा भांगरे , गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज, गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
अधिक वाचा –
– ‘वारु – ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायत’ सरपंचपदी हरिभाऊ निंबळे बिनविरोध । Gram Panchayat Election
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगावात मोरया प्रतिष्ठानकडून रेनकोट आणि पावसाळी बूटचे वाटप