महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दारुंब्रे येथील दोन विद्यार्थीनींचा जिल्हा गुणवत्ता यादीत समावेश झाला आहे. दोन्ही विद्यार्थीनींच्या ह्या यशाबद्दल त्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे सध्या सर्वच स्तरावरून अभिनंदन होत असून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
ह्या यशामुळे तालुक्यात नवा इतिहास घडवणारी शाळा म्हणून दारुंब्रे शाळेचा नावलौकिक झाला आहे. दारुंब्रे शाळेतल्या दोन्ही विद्यार्थीनींनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर हे उज्वल यश संपादित केले आहे. तसेच शाळेतील मार्गदर्शक शिक्षक वर्ग यांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. खास बाब म्हणजे प्रथम प्रयत्नातच शाळेतील 25 विद्यार्थ्यांपैकी 17 विद्यार्थी पास होऊन दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेत, तर 200 गुणांपेक्षा अधिक असणारे 10 विद्यार्थी आहेत. ( Maharashtra State Examination Council Final Result Darumbare ZP School 2 Students Included In District Merit List )
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दारुंब्रे येथील दोन विद्यार्थीनींचा समावेश जिल्हा गुणवत्ता यादीत आहे, 1) कु. श्रद्धा रामदास सोरटे (गुण 254) केंद्रात – प्रथम, तालुकास्तर – आठवा आणि 2) कु. श्रावणी संतोष जाधव (गुण 236) या दोन्ही विद्यार्थीनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन केलेले आहे.
दारूंब्रे शाळेचे वैशिष्ट्य…
शाळेतील मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती सुजाता सुदाम बनकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी म्हणून इयत्ता चौथीपासूनच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली होती. ज्यात एका विद्यार्थीनीने तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला होता. श्रीमती सुजाता बनकर यांनी मार्गदर्शनात सातत्य ठेवून विविध प्रकाशनाचे पुस्तकांचा वापर करून, 65 ते 70 सराव प्रश्नपत्रिका सोडवून सराव करुन घेतला. तसेच अधिकच्या तासाचे आयोजन करून बाह्य मार्गदर्शक तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले.
वर्षभर अध्यापन करत असताना पंचायत समिती मावळ यांची गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूज यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा दिली. या शिष्यवृत्ती यशामध्ये माजी केंद्रप्रमुख संतोष कांबळे, मुख्याध्यापक गौतम चव्हाण, प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांचे सहकार्य लाभले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे, अभिनेत्री साक्षी गांधी यांच्या हस्ते दहावी – बारावीतील 700 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव । Maval Lok Sabha
– एकाच महिन्यात रस्त्यांची चाळण, लोणावळ्यात मनसे आणि भाजपचा मोर्चा, आंदोलनासाठी निवडली हटके स्टाईल