Dainik Maval News : मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत मावळ पंचायत समितीच्या वतीने आयोजित ‘महावाचन महोत्सव 2025’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वराळे येथे उत्साहात पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर व्हावा, त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे आणि वाचन संस्कृतीचा विकास व्हावा या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- कार्यक्रमाचे उद्घाटन मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, मुकुंद तनपुरे, ग्रामविकास अधिकारी अरुण सोळंके, शाळा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय थरकुडे, उपाध्यक्ष योगेश घोंगे,सदस्य उमेश भांगरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
गटविकास अधिकारी प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या महावाचन उपक्रमात त्यांनी उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ‘महावाचन’ या शब्दाची बैठक रचना साकारत केलेली वाचन व्यवस्था. या रचनात्मक बैठकीत विद्यार्थ्यांनी अनुशासनात बसून वाचन केले. ही दृश्यात्मक कलाकृती पाहून उपस्थित सर्व मान्यवरांनी आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भारती यांनी केले, तर मुख्याध्यापिका पंकजा गुंडा यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मुख्याध्यापिका पंकजा गुंडा, उज्वला साळुंखे, अशोक बारवे, गंगाराम शेळके, आराधना जोशी, रमेश गायकवाड, नीलिमा कदम, संतोष भारती, नलिनी नांद्रे, सुरेखा पडवळ, मंगल जगदाळे, दुर्गा ठाकरे, योगेश ठोसर आदी शिक्षकांचे विशेष योगदान लाभले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी
– सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे – खासदार श्रीरंग बारणे
– ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval