उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि महावितरणच्या संपकरी कर्मचाऱ्यांची बैठक यशस्वी झाली आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी राज्यभर आजपासून पुकारलेला तीन दिवसांचा संप मागे घेण्यात आला आहे. ( Mahavitaran Employee Strike Called Off After Meeting With Devendra Fadnavis )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री मा. @Dev_Fadnavis यांनी यशस्वी तोडगा काढला.
धन्यवाद देवेंद्रजी !
आपले सरकार, जनतेचे सरकार— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) January 4, 2023
दिनांक 3 जानेवारीच्या मध्यरात्रीपासूनच संप सुरु करण्यात आला होता. त्यामुळे आज (4 जानेवारी) सकाळपासून राज्यातील अनेक भागात वीजेची समस्या निर्माण होऊन नागरिकांचे हाल होत होते. त्यामुळे सरकारकडून देवेंद्र फडणवीस आणि वीज कर्मचाऱ्यांच्या 32 संघटनांचे प्रतिनिधी यांची तातडीची बैठक झाली. तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यातून सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघाल्याने अखेर वीज कर्मचाऱ्यांचा संप रोखण्यात सरकारला यश आले आहे. तसेच संप मागे घेतल्याची अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळाला नवा भिडू, ‘या’ पक्षासोबत युतीची अधिकृत घोषणा
– तीर्थक्षेत्र देहूत विकास कामांचा धडाका; खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमीपूजन, लोकार्पण