राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित केल्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कार्यान्वित केलेल्या महिला सन्मान योजनेचा महिनाभरात पुणे विभागातील बसेसमधून एकूण 17 लाख 14 हजार महिला प्रवाशांनी लाभ घेतला आहे.
राज्याच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. महामंडळाने 17 मार्च 2023 पासून महिला सन्मान योजना कार्यान्वित केली असून पुणे जिल्ह्यात 16 एप्रिलपर्यंत 17 लाख 14 हजार महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ( Mahila Samman Yojana benefits more than 17 lakh women passengers in Pune district 6 Crore 42 Lakhs income to ST Corporation )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कोणत्या आगारात किती लाभार्थी :
पुणे जिल्ह्यात शिवाजीनगर आगारातून 1 लाख 16 हजार, स्वारगेट 1 लाख 7 हजार, भोर 1 लाख 55 हजार, नारायणगाव 2 लाख 89 हजार, राजगुरुनगर 2 लाख 28 हजार, तळेगाव 75 हजार, शिरुर 1 लाख 18 हजार, बारामती 2 लाख 28 हजार, इंदापूर 1 लाख 71 हजार, सासवड 90 हजार, दौंड 63 हजार, पिंपरी-चिंचवड 51 हजार, एमआयडीसी 82 हजार, असे एकूण जिल्ह्यात 17 लाख 14 हजार महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यातून एसटी महामंडळाला 6 कोटी 42 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे इथे सर्वपक्षीय नेते पदाधिकाऱ्यांकडून स्वर्गीय खासदार गिरीष बापट यांना श्रद्धांजली
– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांची पक्षातून हकालपट्टी