रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडी यांच्या वतीने बुधवारी (दिनांक 19 एप्रिल) खराळवाडीतील जामा मस्जिद मध्ये मुस्लीम बांधवांसह सर्व समाजबांधवांसाठी इफ्तार पार्टी आयोजन करण्यात आले होते. महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संयुक्तरित्या या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असलेल्या रमजान मासातील उपवास काळ निमित्त फळ आहाराचा सर्वांनी आस्वाद घेतला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाची बाब म्हणजे सदर इफ्तार पार्टी वेळी सिमाताई रामदास आठवले या खास उपस्थित होत्या. यावेळी त्यांचा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) वाहतूक आघाडीच्या वतीने अजीजभाई शेख यांनी केला. तसेच यावेळी सामाजिक न्याय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. ( Iftar party for all community members in kharalwadi pimpri organized by rpi transport alliance )
पिंपरी-चिंचवड शहरात विविध धर्मातील नागरिक आपले सण, उत्सव साजरे करतात. त्याचबरोबर विविध कार्यक्रमाचेही आयोजन करत असतात. या सण, उत्सवात आणि कार्यक्रमांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व जाती धर्माचे नागरिक कोणताही भेदभाव न करता त्यामध्ये सहभागी होत असतात. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप देहाडे यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक खराळवाडी जामा मज्जित जमातीच्यासर्व मुस्लिम बांधवांच्या संकल्पनेतून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा – आमदार सुनिल शेळके यांची तळेगावमधील इफ्तार पार्टीला हजेरी; मुस्लिम बांधवांना दिला संदेश
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदेश महिला अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, मा नगरसेवक हमीदभाई शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, बघतो रिक्षावाला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ . केशव क्षीरसागर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतुक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख शशिकांत बेल्हेकर, कामगार नेते इरफान सय्यद, आरपीआयचे नेते सिकंदर सुरवंशी, आरपीआय नेते सचिन वाघमारे, पुणे जिल्हा वाहतूक आघाडीचे अध्यक्ष यादव हरणे, पुणे शहर वाहतूक आघाडी वैभव पवार, पिंपरी चिंचवड शहर वाहतूक आघाडी सदाशिव तळेकर, युवानेते सचिन वाघमारे, देहूरोड शहराध्यक्ष वाहतूक आघाडी गांधी खेड, तालुका अध्यक्ष अभिमान दिसले, भाजपचे दक्षिण भारतीय नागरिक संघाचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले भाजपा अल्पसंख्याक पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष फारुक इनामदार आदी नेते यावेळी उपस्थित होते.
तसेच, दुर्गा ब्रिगेड संस्थापक अध्यक्षा दुर्गा भोर हातगाडी पथारी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी गोपाल मोटघरे, पत्रकार समीर शेख, अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, मराठी पत्रकार परिषदेचे पिं चिं. शहर अध्यक्ष प्रवीण शिर्के, पत्रकार विकास कडले, अखिल मराठी पत्रकार संघाचे पिंपरी- चिंचवड अध्यक्ष दादराव आढाव, सुनील उर्फ बाबू कांबळे विनोद चांदमारे, संतोष जराड गणेश शिंदे, मारुती बाणेवार दिलीप देहाडे, सुरज साळवे, शैलेश जाधव सहीनाद कुरणे, अमोल डंबाळे विश्वजीत पाटील, भगवान सिंह बापू गायकवाड, राजेश तेलंगी, विशाल कदम, भगवान सिंह, मुंबई अध्यक्ष महबूब पठाण या आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे सन्मान यावेळी करण्यात आला.
दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे इथे सर्वपक्षीय नेते पदाधिकाऱ्यांकडून स्वर्गीय खासदार गिरीष बापट यांना श्रद्धांजली
– तळेगावात पार पडला संतशिरोमणी श्री गोरोबाकाका यांचा 706वा पुण्यतिथी सोहळा