Dainik Maval News : मावळ तालुक्यातील वेहेरगाव, कार्ला येथील श्री एकविरा देवी चैत्री उत्सव ४ एप्रिल रोजी सुरू होत असून या कालावधीत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील जड, अवजड वाहतुकीवर काही निर्बंध घालून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.
या आदेशानुसार यात्रा कालावधीत कार्ला फाटा ते श्री एकविरा देवी पायथा मंदिर दरम्यान पूर्ण वेळ अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश निषेध (नो एंट्री) करण्यात येत आहे. मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत जुना मुंबई-पुणे व पुणे-मुंबई महामार्गावारील कुसगाव बुद्रुक टोलनाका लोणावळा ते वडगाव फाटा, वडगाव मावळ असे अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश निषेध करण्यात येत आहे.
- जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन पुणे बाजूकडे जाणारी जड-अवजड व मोठी वाहने यांना लोणावळा येथील कुसगाव बु. टोलनाका मार्गे एक्सप्रेस हायवेने उर्से टोलनाक्यामार्गे पुणे शहराकडे जाण्याकरीता वळविण्यात येणार आहे.
पुण्याकडून मुंबईकडे जाणारी जड अवजड व मोठी वाहने ही वडगाव येथील तळेगाव फाटा येथून उर्से खिंडीतून मुंबईकडे जाण्याकरीता द्रुतगती महामार्गाचा वापर करावा. नागरिकांनी वाहतुकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही डूडी यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान
