व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुण्यात जायचंय? प्रवास सुरु करण्याआधी ही बातमी नक्की वाचा, डेक्कन आणि चतु:श्रुंगी भागात वाहतूकीत मोठे बदल

सुरक्षित वाहतुक सुरु रहावी, तसेच अपघात टाळण्याच्यादृष्टीने वाहतुकीत बदल करण्याबाबतचे तात्पुरते आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 15, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
Pune-Traffic

Photo Courtesy : Atul Waghmare


पुणे शहरातील ( Pune News ) वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्याच्या दृष्टीने डेक्कन वाहतुक विभागाअंतर्गत चैत्राली को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड ते क्षितीज बंगला पर्यंत (जकातदार पथ) दोन्ही बाजूस अंदाजे 250 ते 300 मीटर नो-पार्किंग करण्याचे तसेच चतु:श्रुंगी वाहतूक विभागाअंतर्गत पाषाण- सूस पुलावर सुरक्षित वाहतुक सुरु रहावी, तसेच अपघात टाळण्याच्यादृष्टीने वाहतुकीत बदल करण्याबाबतचे तात्पुरते आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. ( Major Traffic Changes In Pune Deccan And Chatushrungi Area )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

चतु:श्रुंगी वाहतूक विभागांतर्गत पाषाण कडून सूस कडे जाणाऱ्या रस्त्यावर सूस पुलाच्या अलीकडे उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात येत आहे. त्याऐवजी नागरिकांनी पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर वापर करावा. पुणे-बेंगलोर महामार्गालगतच्या सोसायटीतील नागरिकांनी सूस पूल पार करुन २०० मीटर अंतरावर उजवीकडे वळून ननावरे भुयारी मार्गाने इच्छित स्थळी जावे.

पाषाण मार्ग साताराकडे पुणे-बेंगलोर महामार्गालगत जाण्यासाठी वाहन चालकांनी साई चौक पाषाण येथून डावीकडे वळून सुतारवाड पाषाण मार्गे इच्छित स्थळी जावे. हिंजवडी, सूस तसेच मुंबईकडे जाण्यासाठी सूस पूल पार करुन 200 मीटर अंतरावर उजवीकडे वळून सेवा मार्गाने मुंबईकडे तसेच सुसकडे इच्छितस्थळी जावे.

हेही वाचा – राष्ट्रीय लोक अदालतीत 78 हजार प्रलंबित दावे निकाली, पुणे जिल्हा सलग नवव्यांदा राज्यात प्रथम

याबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक 6, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-411006 येथे 25 फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात. नागरिकांच्या सूचना आणि हरकती विचार करुन अंतिम आदेश काढण्यात येणार आहेत. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील, असे पुणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळवले आहे.

अधिक वाचा –

– कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : मतदानापूर्वी तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस बंदी, वाचा संपूर्ण आदेश
– छत्रपती संभाजी महाराज स्मारक आराखडा मंजूर ते राज्यात पीएम श्री योजना राबवणार, वाचा शिंदे-फडणवीस सरकारचे सर्व निर्णय


Previous Post

मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून, परीक्षेसाठी 7000 हून अधिक केंद्र

Next Post

खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश; मतदारसंघातील ‘या’ विकासकामासाठी राज्य सरकारकडून 47 कोटींचा निधी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mp-shrirang-barne

खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश; मतदारसंघातील 'या' विकासकामासाठी राज्य सरकारकडून 47 कोटींचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

March 5, 2026
Accident

भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू ; बधलवाडी – नवलाख उंबरे मार्गावरील घटना

March 5, 2026
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

March 5, 2026
Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.